Mankind IPO : लोकसंख्या वृद्धीला तुम्ही पण घाला आळा नि पैसा कमवा! आज आहे शेवटचा ‘चान्स’

| Updated on: Apr 27, 2023 | 11:36 AM

Mankind IPO : लोकसंख्या वृद्धीला आळा घालणाऱ्या उपक्रमात अप्रत्यक्ष सहभागी होण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. त्यामाध्यमातून तुम्हाला कमाई पण करता येणार आहे.

Mankind IPO : लोकसंख्या वृद्धीला तुम्ही पण घाला आळा नि पैसा कमवा! आज आहे शेवटचा चान्स
Follow us on

नवी दिल्ली : देशातील चौथी सर्वात मोठी फार्मा कंपनी मॅनकाईंड फार्माने (Mankind Company) त्यांचा आयपीओ बाजारात आणला आहे. बाजारातून मोठा निधी जमविण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनीने आयपीओ उतरविला आहे. तीन दिवसांसाठी या कंपनीने आयपीओ खरेदीसाठी खुला ठेवला होता. आज आयपीओ (IPO) खरेदीचा शेवटचा दिवस आहे. मॅनकाईंड फार्मा 25 एप्रिल रोजी आयपीओ बाजारात उतरली होती. कॅलेंडरप्रमाणे या वर्षांतील हा दुसरा आयपीओ आहे. यापूर्वी एवलॉन टेक्नोलॉजीजने पहिला आयपीओ आणला होता. मॅनकाईंड फार्माने त्यांचा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल (Offer For Sale) ठेवला आहे. या आयपीओत कोणताही नवीन शेअर जारी करण्यात आला नाही.

कसा मिळाला रिस्पॉन्स
25 एप्रिल रोजी मॅनकाईंड फार्माचा आयपीओ बाजारात दाखल झाला. मॅनकाईंड औषधीक्षेत्रात अनेक उत्पादने घेऊन आली आहे. कंडोमची निर्मिती पण ही कंपनी करते. बाजारात दाखल झाल्यानंतर या आयपीओने 0.88 पटीत नोंदणी केली. तर किरकोळ विक्री 0.25 पटीत वाढली. नॉन इन्स्टीट्यूशनल इन्व्हेस्टर आणि क्वालीफाईड इन्स्टीट्यूशनल बिडर या श्रेणीत आयपीओला पूर्णपणे सब्सक्राईब करण्यात आले आहे. या गुंतवणूकदारांनी भरभक्कम गुंतवणूक केली आहे. एनआयआयने 1.02 पटीत तर क्यूआयबी श्रेणीत 1.86 पटीत रक्कम गुंतवली.

मॅनकाईंड फार्मा 25 एप्रिल रोजी आयपीओ बाजारात उतरली होती. कॅलेंडरप्रमाणे या वर्षांतील हा दुसरा आयपीओ आहे. यापूर्वी एवलॉन टेक्नोलॉजीजने पहिला आयपीओ आणला होता. मॅनकाईंड फार्माने त्यांचा आयपीओ पूर्णतः ऑफर फॉर सेल (Offer For Sale) ठेवला आहे. या आयपीओत कोणताही नवीन शेअर जारी करण्यात आला नाही.

हे सुद्धा वाचा

आयपीओची खास वैशिष्ट्ये

  1. आयपीओत प्रमोटर आणि गुंतवणूकदारांचे 4 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी शेअरची विक्री करतील
  2. कंपनीने आयपीओचा प्राईस ब्रँड 1026-1080 रुपये प्रति शेअर आहे. आयपीओचा लोअर प्राईस ब्रँड 4,110 कोटी रुपये तर हाईअर प्राईस ब्रँड 4,326 कोटी रुपये टप्प्यात आहे.
  3. आयपीओची लॉट साईज 13 ठेवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना कमीत कमी एका लॉटमध्ये गुंतवणूक करावी लागेल. त्यानुसार, प्रत्येक गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,040 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक होते. कंपनीने या आयपीओची जास्तीत जास्त लॉट साईज 14 (182 शेअर) ठेवली आहे.
  4. आयपीओची ऑफर साईजमधील 50 टक्के क्वालीफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स 15 टक्के, 35 टक्के शेअर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
  5. 3 मे पर्यंत कंपनी आयपीओ शेअर अलॉटमेंट अंतिम करणार आहे. ज्या खातेदारांना आयपीओ मिळाला नाही. त्यांना त्यांच्या खात्यात 4 मेपर्यंत रक्कम परत मिळेल. पात्र गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात 8 मे पर्यंत शेअर हस्तांतरीत करता येईल.