नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : महागाईला (Inflation) हातभार लावण्यात साखर पण मागे नाही. साखरेने पण आघाडी घेतली आहरे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी साखर कडू झाली आहे. साखरच्या उत्पादनाला फटका बसल्याने यंदा सणासुदीत किंमती भडकण्याची शक्यता आहे. पण शेअर बाजारात (Share Market) , गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होत आहे. शुगर शेअरने गोडवा वाढवला आहे. या आठवड्यातील चौथ्या व्यापारी सत्रात, गुरुवारी साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअरने (Sugar Share) कमाल केली. हे शेअर सध्या तेजीत आहे. बीएसईवर (BSE) या शेअरने जोरदार बॅटिंग केली आहे. गुंतवणूकदारांन या तेजीने धक्का बसला. त्यांनी चांगली कमाई केली. येत्या काही दिवसात हे शेअर अजून कमाल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काय म्हणतात तज्ज्ञ, काय आहे त्यांचा दावा?
या स्टॉकने घेतली उसळी
गुरुवारी शेअर बाजारात साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअरने जोरदार उसळी घेतली. हे स्टॉक 20 टक्क्यांपर्यंत वधारले. या शेअरमध्ये डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, मगध शुगर अँड एनर्जी, उत्तम शुगर मिल्स, अवध शुगर अँड एनर्जी, धामपूर साखर मिल्स, बलरामपूर साखर मिल्स या शेअरने चांगली कामगिरी दाखवली. हे शेअरनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
14 सप्टेंबर रोजी असा शेअरचा भाव
तज्ज्ञांचे मत काय
अनेक ब्रोकरेज फर्मने शुगर स्टॉक्स खरेदीला हिरवा झेंडा दाखवला आहे. तज्ज्ञांच्या मते, साखर कंपन्या आर्थिक वर्ष 2023-2026 या दरम्यान जबरदस्त वृद्धी दाखवतील. सध्या पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात उत्पादनावर परिणाम दिसेल. त्यामुळे साखरेचे भाव वाढण्याची भीती आहे. किरकोळ बाजारात एक किलो साखरेचा भाव 37 रुपयांपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साखर कंपन्याचे शेअर दमदार कामगिरी बजावतील असा दावा करण्यात येत आहे.
इतके घसरणार उत्पादन
यंदा महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन घसरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 2023-24 या पीक वर्षात साखरेच्या उत्पादनात 14 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. पण डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, मगध शुगर अँड एनर्जी, उत्तम शुगर मिल्स, अवध शुगर अँड एनर्जी, धामपूर साखर मिल्स, बलरामपूर साखर मिल्स चांगला महसूल जमा करतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.