नवी दिल्ली : ऐन थंडीत तुम्हाला अंडे महाग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला काही दिवसात जास्त दाम मोजावे लागू शकतात. अंड्यांच्या किंमतीत (Egg’s Price) वाढ होण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठ्यात अडथळे येत असल्याने किंमत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एवढेच नाही तर भारताने अंडे निर्यातीत (Export) आघाडी घेतली आहे. बाजारातील तज्ज्ञानुसार भारतीय अंडे सर्वात महाग असलेले महागडे उत्पादन ठरले आहे. इंग्लंड आणि मलेशियातून (England And Malaysia) अंडे विक्रीत कमी येत असल्याने भारतीय अंड्यांना प्रचंड मागणी आली आहे.
भारतीय अंड्याच्या निर्यातीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. जगभरात अंड्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेत अंड्याची किंमत या वर्षात सर्वाधिक वाढली आहे. वर्ष दर वर्षात या किंमतीत 220% टक्क्यांची वाढ झाली आहे. दर महिन्यात किंमतीत 125% वाढ झाली आहे.
वायदे बाजारात अंडे सर्वात महागडे उत्पादन ठरले आहे. अंड्यांचे उत्पादनात जागतिकस्तरावर कमी आली आहे. अनेक अंडे निर्यातक देशांमध्ये अंड्यांचे उत्पादन घटले आहे. त्यादेशात अंड्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
भारत जगातील दुसरा सर्वात मोठा अंडे उत्पादक देश आहे. दरवर्षी भारतात 11,440 कोटी अंड्यांचे उत्पादन करण्यात येते. अंडे उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे. फीफा वर्ल्ड कपमुळे भारतीय अंडे निर्यात करणाऱ्यांची चांदी होत आहे.
कतरकडे अंडे उत्पादक आणि निर्यातकांनी मोर्चा वळविला आहे. इतर देशांकडून पुरवठ्यात आलेली कमतरता भारत भरून काढत आहे. पूर्वी कतारला केवळ 10 कंटेनर जात होते. पण सध्या कतारला 40 कंटेनर भरुन पाठविण्यात येत आहे. त्यामुळे देशात अंड्याची कमतरता भासणार आहे.
अंड्यांची मागणी वाढल्याने दोन कंपन्यांच्या शेअरवर नजर ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये Venkys आणि SKM Eggs या शेअरमध्ये जोरदार वृद्धीचे संकेत आहेत. तसेच हा शेअर काही दिवसात सूसाट जाण्याचा अंदाज आहे.
वेंकिज कंपनीचे शेअरमध्ये आज 229.10 रुपये अथवा 12.63% वृद्धी दिसून येत आहे. आज 2,043 रुपये प्रति शेअरवर हा बंद झाला. गेल्यावेळी हा शेअर 1,813 वर बंद झाला होता. SKM Eggs मध्ये 6.50 रुपये अथवा 4.97% वृद्धी होईल. सध्या हा शेअर 137.30 रुपयांवर बंद झाला आहे.