एलसिड इन्वेस्टमेंट्स ( Elcid Investment ) च्या समभागाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ माजविली आहे. कंपनीने तिच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एकाच दिवसात करोडपती केले आहे. या कंपनीच्या स्टॉकने एकाच दिवसात 66,92,535% चे बंपर रिटर्न देऊन सर्वांनाच आर्श्चयचकीत केलेले आहे. धनोत्रयोदिशीच्या दिवशी या कंपनीच्या शेअरने दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी केली आहे. या दिवशी एकाच दिवशी कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवरुन थेट 2,36,250 रुपयांच्या उंचीवर पोहचला. जेव्हापासून या स्टॉकबाबत लोकांना समजले आहे. तेव्हापासून कंपनीच्या मालकाबाबत खूपच चर्चा होत आहे. तर मग पाहूयात एलसिड इन्व्हेस्टमेंटचा मालक कोण ? त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे?
एलसिड इन्व्हेस्टमेंट कंपनीला देशाचा सर्वात महागडा शेअर बनविण्यात या कंपनीच्या लोकांचा मोठा हात आहे. एलसिड इन्व्हेस्टमेंटच्या बोर्ड ऑफ मेंबर्समध्ये वरुण अमर वकील, अमृता अमर वकील, एस्साजी गुलाम वहानवटी आणि कार्तिकेय ध्रुव काजी यांच्या नावांचा समावेश आहे. वरुण अमर मलिक कंपनीचे नॉन एक्झुकेटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंड डायरेक्टर आहेत. तर अमृता अमर वकील देखील नॉन एक्झुकेटिव्ह नॉन इंडिपेंडेंड संचालक आहेत. कंपनीत एस्साजी गुलाम वहानवटी आणि कार्तिकेय ध्रुव हे देखील नॉन एक्झुकेटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंड डायरेक्टर आहेत. रागिनी वरुण वकील या मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर आयुष डोलानी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी आहेत.
गुंतवणूकदारांना एका दिवसात करोडपती बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाकडे 748 कोटींची संपत्ती आहे. अमर मलिक यांच्याकडे पब्लिकली त्यांच्या कंपनीचा एक स्टॉक आहे. वरुण अमर वकील यांच्या कमाईचे अनेक सोर्स आहेत. परंतू त्यांच्या कंपनीतून त्यांची चांगली कमाई होते.
एलसिड इन्वेस्टमेंट्स आरबीआयच्या गुंतवणूक वर्गवारीतील एक रजिस्टर्ड नॉन बॅंकींग फायनान्स कंपनी आहे. कंपनीच्या कमाईचा मुख्य मार्ग होल्डींग कंपन्यांकडून मिळणारा डिव्हीडंड आहे. एलसिड इन्वेस्टमेंट्सने देशाची नंबर वन पेंट्स कंपनी एशियन पेंट्स मध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. देशातील दिग्गज पेंट्स कंपनीत एलसिड जवळ 8500 कोटींची 2.95 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनीजवळ 200,000 शेअरची इक्वीटी बेस आहे.ज्यात 150,000 शेअर प्रमोटरकडे आहेत.