नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘टेस्लाचे’ (Tesla) मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरला मोठा झटका दिला आहे. एलन मस्क यांनी ट्विटरसोबतची डील रद्द केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर विकत घेत असल्याची घोषणा केली होती. ही डील 44 बिलियन डॉलरमध्ये ठारली होती. मात्र आता आपन ही डील रद्द करत असल्याची घोषणा मस्क यांनी केली आहे. एलन मस्क यांनी ही डील का रद्द केली याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ट्विटवर किती फेक खाती आहेत, याची अचूक माहिती कंपनीला न देता आल्याने मस्क यांनी ही डील रद्द केल्याचे बोलले जात आहे. आता यावर ट्वीटरकडून (Twitter)देखील प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला ही डील पूर्ण करायची आहे, त्यामुळे आता आम्ही मस्क यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीची घोषणा केल्यानंतर या व्यवहाराची चांगलीच चर्चा झाली होती.
एलन मस्क यांनी ट्विटरसोबतची डील रद्द का केली यावरून आता अनेक अंदाज बांधले जात आहेत. मात्र दुसरीकडे ही डील रद्द केल्यानंतर आम्ही एलन मस्क यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहोत असे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, डील फायनल करतान ज्या अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटीनुसार एलन मस्क यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ही डील पूर्ण करावीच लागणार आहे. ते देखील ठरलेल्या रकमेमध्ये मात्र त्यांनी आता डील रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहोत. आम्हाला खात्री आहे की हा दावा आम्हीच जिंकू
14 एप्रिल रोजी मस्क यांनी ट्विटरच्या डीलबाबत घोषणा केली होती. 44 बिलियन डॉलरमध्ये हा व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी एकदा ट्विटरच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधला होता. मात्र आता अचानक त्यांनी ट्विटरसोबतची डील रद्द केली आहे. ट्विटरवर किती बनावट खाती आहेत? याची अचूक माहिती कंपनीला न देता आल्याने ही डील मस्क यांनी रद्द केल्याचे बोलले जात आहे. मात्र आम्ही आता याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी म्हटले आहे. तसेच न्यायालयात आम्ही हा दावा जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.