Twitter : Blue Tick साठी पुन्हा पेड सर्व्हिस, या तारखेपासून सुरुवात.. एलॉन मस्क यांची घोषणा..

| Updated on: Nov 16, 2022 | 5:09 PM

Twitter : Blue Tick सशुल्क सेवा ट्विटरने पुन्हा एकदा सुरु केली आहे, या तारखेपासून ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत..

Twitter : Blue Tick साठी पुन्हा पेड सर्व्हिस, या तारखेपासून सुरुवात.. एलॉन मस्क यांची घोषणा..
सशुल्क सेवा पुन्हा सुरु
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : Blue Tick सशुल्क सेवा ट्विटरने (Twitter) पुन्हा एकदा सुरु केली आहे. या तारखेपासून युझर्स (Users) पैसे मोजावे लागणार आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) याने ही घोषणा केली आहे. त्यामुळे ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहे.

ट्विटरने ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांकडून यापूर्वीच शुल्क वसूली सुरु केली होती. परंतु, या सेवेचा काही वापरकर्त्यांना अत्यंत दुरुपयोग केला. बनावट खाती उघडत त्यांनी अनेक कंपन्यांना गंडविले. त्यांच्या नावाचा गैरउपयोग करत त्यांचे नुकसान केले.

ट्विटर आता 29 नोव्हेंबरपासून ही सेवा सशुल्क करणार आहे. खात्यातील या गडबडीमुळे ट्विटरची नाचक्की झाली. त्यांनी ही सेवा तात्काळ बंद केली होती. मस्कने ही सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

मस्क येण्यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी ही सेवा पूर्णपणे मोफत होती. ब्लू टिक ही जागतिक नावाजलेल्या व्यक्ती, अभिनेता, अभिनेत्री, राजकीय नेते, पब्लिक फिगर, पत्रकार यांना व्हेरिफाईड केल्यानंतर देण्यात येत होती.

मस्क आल्यानंतर त्यांनी ही सेवा सशुल्क करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागतील हे स्पष्ट करण्यात आले. 6 नोव्हेंबरपासून ही सेवा सशुल्क केल्याची घोषणा करण्यात आली आणि लागलीच गडबडीमुळे काही कालावधीसाठी ही सेवा खंडीत करण्यात आली.

मस्क यांनी ट्विट करत ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली. येत्या 29 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता सर्व तपशील आणि माहितीची खात्री केल्याशिवाय ही सशुल्क सेवा प्रदान करण्यात येणार नसल्याची ग्वाही मस्कने दिली आहे.

एलॉन मस्क होणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी खूप मेहनत घेणे आवश्यक आहे. मस्क गेल्या काही दिवसांपासून ट्विटरच्याच कार्यालयात डेरा टाकून आहेत. ते कार्यालयात उशीरा रात्री जागतात आणि तिथेच झोप घेत आहेत.