नवी दिल्ली | 11 February 2024 : केंद्रातील भाजप सरकारने लोकसभेची तयारी सुरु केलेली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या पीएफवरील व्याजात दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाखो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षात ईपीएफवरील व्याजदरात वाढ केली आहे. तर काँग्रेसनंतर निच्चांकी व्याज दराचा विक्रम मोदी सरकारच्याच नावे आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 0.05 टक्के वाढ केली. आता आर्थिक वर्ष 2023-24 साठी 0.10 टक्के वाढ केली. म्हणजे गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने ईपीएफच्या व्याज दरात 0.15 टक्क्यांची वाढकेली. एकूण व्याज दर आता 8.25 टक्के आहे. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी व्याजदर आहे.
कसा कपात होतो ईपीएफ?
ईपीएफओ कायद्यानुसार, कर्मचाऱ्याचा मुळ पगार आणि महागाईच्या 12 टक्के रक्कम प्रोव्हिडंट फंडमध्ये जमा करण्यात येते. तर कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात 12 टक्के निधी जमा करते. पण यामधील 3.67 टक्के वाटा ईपीएफमध्ये जमा होतो. तर 8.33 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेत जमा होते. सध्याच्या व्याज दरा आधारे त्यावर ठराविक कालावधीनंतर रक्कम जमा होते.
खात्यात किती जमा होणार व्याजाची रक्कम?
ईपीएफओची संस्था CBT ने ईपीएफ व्याजदरात 8.25 टक्के वाढीचा निर्णय घेतला. पूर्वी हा व्याज दर 8.10 टक्के होता. आता या निर्णयाचा कसा फायदा होईल ते समजून घेऊयात. समजा, तुमच्या पीएफ खात्यात एकूण 1 लाख रुपयांची रक्कम जमा आहे. तर गेल्या आर्थिक वर्षातील व्याजदर 8.15 टक्क्यांच्या हिशोबाने 8,150 रुपये बँक खात्यात जमा होतील. आता व्याजदरात वाढ झाली आहे. व्याजदरात वाढ होऊन ते 8.25 टक्क्यांवर पोहचले आहे. जर एखाद्या बँक खातेदाराच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर आता त्याला 8250 रुपये व्याज मिळेल. म्हणजे ईपीएफ खातेदाराला आता 100 रुपयांचा फायदा होईल.
या तीन पद्धतीने तपासा बॅलन्स
अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.
उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स
मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या
एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम