मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) पेन्शनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला अर्थात लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली आहे. तसेच, पेन्शनधारक वर्षभरात कोणत्याही वेळी जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. ईपीएफओने पेन्शनधारकांना गर्दी टाळण्यासाठी व रांगेत उभे न राहण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांना घराबसल्या हयातीचा दाखल ऑनलाईन सुविधेद्वारे सादर करता येणार आहे. याद्वारे सुविधेद्वारे आपण आपल्या जवळच्या टपाल कार्यालयातून किंवा पोस्टमनद्वारे हे प्रमाणपत्र सादर करू शकता (Epfo provides facility to pensioners to submit digital life certificates).
पेन्शनधारकांना पोस्टमनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी http://ccc.cept.gov.in/covid/request.aspx वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्यासमोर एक टॅब उघडेल. यात ‘सिलेक्ट सर्व्हिस’ या पर्यावर क्लिक करा. यानंतर ‘आयबीपीएस’ हा पर्याय निवडा आणि त्यानंतर आयबीपीएस सर्व्हिस यावर क्लिक करून जीवन प्रमाणपत्र या पर्यायची निवड करा. यानंतर पेन्शनधारकांना वर्षाभरात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
नाममात्र शुल्क भरल्यानंतर आता पेन्शनधारक ऑनलाईन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सेवेसाठी विनंती करु शकतात. यानंतर जवळच्या टपाल कार्यालयातील एक पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी जाईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.
नुकतीच ईपीएफओने पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2021पर्यंत वाढवली होती. याचा फायदा ईपीएफओमध्ये उपस्थित असलेल्या साडेतीन लाख पेन्शनधारकांना होईल, असे दावा त्यांनी केला होता. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वृद्ध लोकांना कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन, ईपीएफओने हा निर्णय घेतला आहे (Epfo provides facility to pensioners to submit digital life certificates).
प्रत्येक पेन्शन धारकाला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एका पेन्शन खाते असलेल्या बँकेत जीवन प्रमाणपत्र अर्थात हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हयातीचा दाखला पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. तो वेळेवर जमा न केल्यास पेन्शन थांबवले जाते.
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हल्ली उमंग अॅपद्वारेदेखील बनवता येतं. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये उमंग अॅप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर त्याच्यावर हयातीचा दाखला शोधलं असता, तुम्हाला ‘जनरेट लाइफ सर्टिफिकेट’ असा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर पेन्शनर ऑथेंटिकेशनसाठी पेज उघडेल. यामध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्हाला डिजिटल लाईफ प्रमाणपत्र मिळू शकतं.
(Epfo provides facility to pensioners to submit digital life certificates)
पेन्शनधारकांनो लक्ष द्या; ‘हे’ प्रमाणपत्रं जमा न केल्यास पेन्शन थांबणार!https://t.co/dOLmDfxSB0
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020