नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या (New Year) सुरुवातीलाच सरकारकडून (Government) नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 (Financial Year 2019-20) साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (epfo) 8.5 टक्क्यांचं पूर्ण व्याज (interest rate) दिलं आहे. सरकारकडून तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांआधीच कामगार आणि वित्त मंत्रालयाची व्याज दराशी संबंधित प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये वित्त मंत्रालयाने जोखीम असणाऱ्या गुंतवणूकीबद्दल चिंता व्यक्त करत तपशील मागवून त्यावर चर्चा केली. (EPFO send pf interest rate 8.5 percent in your account, know how to check provident fund balance)
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे संतोष कुमार गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांच्या अध्यक्षतेखालील सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या बैठकीत Covid-19 मुळं ईपीएफओच्या सीबीटीने दोन हप्त्यांमध्ये व्याज देण्याची घोषणा केली होती. यानुसार, दिवाळीपर्यंत 8.15 टक्के व्याज खात्यात जमा केलं जाईल असं ईपीएफओने ठरवलं होतं. तर उर्वरित 0.35 टक्के हिस्सा समभागांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून दिला जाईल. पण नंतर ईपीएफओने आपला निर्णय बदलून दिवाळीत हप्ता न देता तो आता ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आर्थिक वर्ष 2020 (Financial Year 2020 ) मध्ये ईपीएफवरील व्याज दराच्या 8.50 टक्के व्याज ग्राहकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
फायदाही डबल
EPFO च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरपर्यंत वाट पाहिल्यामुळे सर्व ग्राहकांना डबल फायदा मिळाला आहे. खातेधारकांच्या खात्यामध्ये व्याज येण्यास थोडा उशिर झाला असला तरी ही चांगली बाब आहे. कारण, EPFO च्या एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या (ETF) विक्रीतून चांगली कमाई झाली आहे. 8.50 टक्के व्याज दिल्यानंतरही EPFO कडे 1,000 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम शिल्लक आहे. सप्टेंबरमध्ये जेव्हा दोन टप्प्यांमध्ये व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी EPFO कडे 500 कोटी रुपये होते. पण आता यामध्येही वाढ झाली आहे.
असा चेक करा EPF खात्यातील बॅलेंस (Check EPF account balance)
1. सगळ्यात आधी Epfindia.gov.in वर लॉगिन करा
2. यानंतर तुमचा UN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरा.
3. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला ई-पासबुकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
4. यामध्ये विचारली गेलेली माहिती भरून ओके बटनावर क्लिक करा.
5. यानंतर मेंबर आयडी उघडा
6. हे केल्यानंतर आपोआपच तुम्ही EPFO खात्यामधील एकूण बॅलेंस पाहू शकता.
हेही वाचा
PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम
Fixed Deposit : नवीन वर्षात करा सुरक्षित गुंतवणूक, या 5 बँकाकडून FD वर सर्वाधिक व्याज
210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 60 हजार, कोरोना काळात 15 लाख लोकांनी सुरू केली ‘ही’ सरकारी योजना
PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग प्रत्येक महिन्याची 5 तारीख विसरू नका, ‘हे’ आहे कारण
(EPFO send pf interest rate 8.5 percent in your account, know how to check provident fund balance)