नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO लवकरचं 2020-21 च्या व्याजदराबाबत घोषणा करणार

| Updated on: Feb 16, 2021 | 11:37 AM

EPFO कडून 2020-21 वर्षासाठी व्याज दराची घोषणा मार्चमध्ये केली जाऊ शकते. EPFO to announce pf interest rates for 2020-21 in March

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO लवकरचं 2020-21 च्या व्याजदराबाबत घोषणा करणार
ईपीएफओ
Follow us on

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) कडून 2020-21 वर्षासाठी व्याज दराची घोषणा मार्च महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची पुढील बैठक 4 मार्चला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्या बैठकीत 2020-21 वर्षासाठी व्याज दराची घोषणा केली जाऊ शकते. ईपीएफओकडून सीबीटी सदस्यांच्या बैठकीचा अजेंडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचं म्हटलंय. (EPFO to announce pf interest rates for 2020-21 in March)

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत 2020-21 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खातेदारांना द्यायच्या व्याज दराबाबत चर्चा होऊ शकते. ईपीएफओचे जवळपास 6 कोटी ग्राहक आहेत. त्यांच्या खात्यामध्ये व्याज जमा केले जाते. 2019-20 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून 8.5 टक्के व्याज दर दिला होता. गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याज दर होता. 2018-19 मध्ये 8.65 टक्के व्याज देण्यात आले होते.

श्रीनगरला बैठक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची पहिली बैठक 5 फेब्रुवारी 1953 मध्ये झाली होती. त्यानंतर श्रीनगरला बैठक झालेली नाही. सीबीटीच्या बैठका दिल्ली, शिमला, पटना, चेन्नई आणि मुंबईमध्ये झाल्या आहेत.

घरबसल्या ईपीएफओवर केवायसी अपडेट

आपल्या यूएएन नंबरमध्ये केवायसी करण्यासाठी आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण आपली केवायसी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करू शकता. यासाठी यूएएन पोर्टलवर जा आणि केवायसीच्या पर्यायावर क्लिक करा. समोर उघडलेल्या विंडोमध्ये पॅन, आधार, मोबाईल नंबर, बँक खाते असलेल्या विभागावर क्लिक करा. त्यात आपली माहिती भरा आणि सबमिट करा. आता आपले पॅन आणि आधार त्यात जोडले जातील. परंतु, ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला आपल्या एम्प्लॉयरला सूचित करावे लागेल. एम्प्लॉयर पडताळणी होताच आपण ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असाल.

संबंधित बातम्या:

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ खात्यात पाठवणार पैसे

दरवर्षी PF वरील व्याजाचा दर बदलतो, यंदा कधी आणि किती व्याज मिळणार? वाचा…

(EPFO to announce pf interest rates for 2020-21 in March)