Marathi News Business Even after filing ITR you may get notice for meny reasons Know the types of income tax notices
Income Tax : आयटीआर भरल्यावरही तुम्हाला ‘या’ कारणांसाठी येऊ शकते नोटीस; जाणून घ्या आयकर नोटीसचे विविध प्रकार
आयकर (income tax) भरल्यानंतर आता कोणतेही टेंशन नाही असे म्हणून अनेक जण निवांत होतात. परंतु आयटीआर (ITR) भरल्यावर देखील नोटीस येऊ शकते. जाणून घेऊयात नोटीसच्या विविध प्रकारांबाबत
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on
आयकर (income tax) भरल्यानंतर आता कोणतेही टेंशन नाही असे म्हणून अनेक जण निवांत होतात. परंतु आयटीआर (ITR) भरल्यावर देखील नोटीस येऊ शकते. करदात्याला (taxpayer) अनेक प्रकारच्या नोटीस येऊ शकतात. टॅक्स आणि उत्पन्न यामध्ये अंतर म्हणजे जास्त फरक दिसला तर नोटीस येऊ शकते. तसेच रिटर्नमध्ये जास्त रिफंडची मागणी केल्यास देखील नोटीस येते. चला तर मग जाणून घेऊयात आयक विभागाच्या नोटीस किती प्रकारच्या असतात आणि त्या का पाठवल्या जातात.आयकर नोटीस अनेक प्रकारच्या असतात. परंतु ती नोटीस कोणती व्यक्ती, व्यवसाय किंवा कंपनीला पाठवली जात आहे यावर तिचे अवलंबून असते. जवळपास 15 ते 20 प्रकारच्या नोटीस आहेत. यामध्ये काही नोटीस व्यक्तीला पाठवल्या जातात. आयकर विभागाकडून व्यक्तीला पाठवण्यात येणाऱ्या काही निवडक नोटीसीबद्दल जाणून घेऊयात.
आयकर विभागाच्या नोटीस
कलम 142 जर एखाद्या व्यक्तीने ITR भरला नसेल तर आयकर अधिकारी 142 अंतर्गत नोटीस पाठवून रिटर्न भरण्यास सांगतात. तसेच काही लहान-सहान माहिती किंवा स्पष्टीकरण मागितल्यासदेखील या कलमाअंतर्गत नोटीस पाठवली जावू शकते.
कलम 143(2) ही तपासणीसंदर्भातील नोटीस असते. याचा अर्थ म्हणजे आयकर विभागामार्फत तुमची चौकशी किंवा तपासणी होऊ शकते. या नोटीसअंतर्गत पासबुक, बँक स्टेटमेंटसारख्या अनेक कागदपत्रांची मागणी होऊ शकते. या कागदपत्रांच्या आधारे समीक्षा केली जाते. रिटर्न भरल्यानंतर ही नोटीस येते. नोटीसांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नोटीसचे प्रमाण अधिक आहे.
हे सुद्धा वाचा
कलम 144 याला बेस्ट जजमेंट असेसमेंट म्हणतात. जर तुम्ही ITR फाइल केला नसेल आणि 142 किंवा 143 (2) अंतर्गत आलेल्या नोटीसचे उत्तर दिले नसेल तर आयकर अधिकारी कलम 144 अंतर्गत नोटीस पाठवू शकतात. यामध्ये अधिकारी असलेल्या माहितीच्या आधारे उत्पन्नाचा अभ्यास करून त्यावर कर,व्याज आणि दंड लावू शकतात.
कलम 147, 148,149 जर आपल्या उत्पन्नाच्या आधी जीअसेसमेंट झालेली असते आणि त्यामध्ये उत्पन्नाचा काही भाग समाविष्ट नसेल. तसेच तुमचे असे उत्पन्न असेल ज्याचा खुलासा केला नसेल तर ही नोटीस येऊ शकते.
कलम 143 (1) या कलमाअंतर्गत नोटीस आल्यास तुमच्या ITR मध्ये काहीतरी चूक झाली आहे असे समजावे. तसेच काही चुकीची माहिती दिल्यास आयकर अधिकारी नोटीस जारी करून तुम्हाला कारण विचारतात. योग्य उत्तर मिळाले नाही तर उत्पन्नातील वाढ किंवा डिडक्शन केले जाते. या व्यतिरिक्त डिफेक्टिव्ह रिटर्नसाठी कलम 139 (9), तपासणी किंवा जप्तीसाठी कलम 153 (A),व्याज किंवा दंड बाकी राहिला असेल तर कलम 156 आणि उत्पन्न लपवल्याचा संशय असल्यास कलम 131 (A) अंतर्गत नोटीस पाठवण्यात येते.