नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : भारत जगातील निवडक देशांपैकी एक आहे, जिथे मोठं-मोठ्या उद्योग समुहाचा गाडा त्यांचे कुटुंबिय हाकतात. शेअर होल्डर्स आणि कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य बदलत राहतात. पण गुंतवणूकदारांचा भरवसा कायम ठेवण्यासाठी, कमावलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मुळ कुटुंबातीलच कोणाला तरी समर्थपणे त्या त्या समूहाचे नेतृत्व (Successors of Business Empire) करावे लागते. अशा वेळी जेव्हा Tata वा Mahindra या सारख्या मोठ्या उद्योगसमूहाने काही कारणांमुळे वारस मिळत नाही, तेव्हा या साम्राज्याचा डोलारा कोण सांभाळतो. इतक्या वर्षांचा हा वारसा जपल्या कसा जातो. सध्या सिप्ला कंपनीचे असेच प्रकरण गाजत आहे. काय आहे या यशाची गुरुकिल्ली?
Tata Group
देशातील सर्वात मोठे बिझनेस एम्पायर म्हणजे टाटा समूह आहे. रतन टाटा यांचा कोणी वारस नाही. त्यासाठी कुटुंबातील बाहेरुन सायरस मिस्त्री यांच्या हातात समूहाची कमान सोपविण्यात आली. पण सायरस मिस्त्री यांच्याशी पटले नाही तेव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यांच्या जागी एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली. तरीही टाटा समूहाची मालकी कुटुंबातील सदस्यांकडेच आहे. रतन टाटा यांनी टाटा ट्रस्ट तयार केले आहे. त्याच्या वारसाची घोषणा करण्यात आली नाही.
Mahindra Group
महिंद्रा ग्रुपमध्ये आनंद महिंद्रा यांना दोन मुली आहेत. पण त्यांच्याकडे समूहातील कोणत्या महत्वाच्या पदाची जबाबदारी नाही. आनंद महिंद्रा यांचे मित्र उदय कोटक यांनी नुकतीच कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावरुन राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी प्रोफेशनल्स आता बँकेचा कारभार सांभाळतील. तर त्यांच्या दोन मुलांकडे कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णय संचालक मंडळ घेणार आहे.
सिप्ला विक्रीला
देशातील तिसरी सर्वात मोठी औषधी कंपनी सिप्लाचे चेअरमन युसूफ हमीद यांच्या वारसदारांना हा कारभार सांभाळायचा नाही. त्यामुळे आता 87 वर्षांचे युसूफ हमीद यांनी हा व्यवसाय विक्री करण्याचा निर्णय घेतला. अशीच काहीशी कथा बिसलेरी ब्रँडसोबत दिसली. मालक रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान हिला या व्यवसायात आवड नसल्याचे वृत्त समोर आले होते. पण व्यवसायाची विक्री झाली नाही आणि जयंती यांनी पुन्हा कारभाराची सूत्र हाती घेतली.
भारताची टॉप बिझनेस महिला किरण मजूमदार शॉ आज 32000 कोटी रुपयांच्या बायोकॉन ग्रुपच्या मालक आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू ओढावला. त्यांना कोणतेही आपत्य नाही. त्यांच्या बायोकॉन ग्रुपच्या वारस कोण असेल हे चित्र स्पष्ट नाही.