नवी दिल्ली : देशात कामसंदर्भातील (Labor Reform) बदलाचं वारं वाहत आहे. केंद्र सरकार लवकरच देशात 4 नवीन लेबर कोड (New Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, सुट्टी, प्रोव्हिडंट फंड आणि ग्रॅज्युएटीमध्ये (Gratuity) बदल होईल.
आता तुम्ही म्हणाल हे तर सगळं ठीक आहे. काय बदल व्हायचा तो होईल. पण ते लॉटरीचं काय? तर मित्रांनो हे चार कायदे लागू झाले तर तुम्हाला लॉटरी लागू शकते. तेही एकाच वर्षात. पण त्यासाठी हे कायदे लागू होण्याची वाट पहावी लागेल.
तर ही लॉटरी कशी लागेल असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे. ग्रॅज्युएटीमुळे तुम्हाला ही लॉटरी लागणार आहे. एखाद्या कंपनी, संस्थेत तुम्ही सलग 5 वर्षे नोकरी केली तर तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळत होती. पण आता यामध्ये बदल होणार आहे.
केंद्र सरकारने ग्रॅज्युएटीसाठी सलग पाच वर्षांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक याची औपचारिक घोषणा मात्र केंद्र सरकारने केलेली नाही.
सध्या ग्रॅज्युएटीचा विचार करता, प्रत्येक वर्षाच्या 15 दिवसांचा पगार ग्रॅज्युएटीमध्ये मिळतो. महागाई भत्त्यासह पगार 26000 असेल तर 26 दिवसांचे वेतन गृहित धरण्यात येईल. म्हणजे कामासाठी प्रत्येक दिवशी 1000 रुपये मिळतील.
आता या कामगाराला ग्रॅज्युएटीसाठी प्रत्येक वर्षी 15 दिवसांचा 15000 पगार मिळेल. पाच वर्षांच्या हिशोबाने ही रक्कम असेल 75000 रुपये, म्हणजे संबंधीत कामगाराला पाच वर्षांसाठी 75000 रुपये ग्रॅज्युएटी मिळेल.
1 वर्षाच्या नोकरीत ग्रॅज्युएटी मिळावी, यासाठी लोकसभेत ड्राफ्टची कॉपी तयार करण्यात आली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास प्रत्येक कर्मचारी ज्याने एक वर्ष नोकरी केली आहे, त्याला ग्रॅज्युएटी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या एखाद्या कंपनी, संस्थेत तुम्ही सलग 5 वर्षे नोकरी केली तर तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते. लवकरच त्यात बदलाची नांदी येऊ शकते.