नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) महागाईच्या पाठीमागे हात धुऊन लागली आहे. तर महागाई सर्वसामान्यांचा पिच्छा सोडतान दिसत नाही. महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी सोमवारी पुन्हा रेपो दरात (Repo Rate) वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पुन्हा भार पडण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक 5 डिसेंबरपासून सुरु होत आहे. दोन दिवस ही बैठक सुरु राहील.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयचे जोरकस प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी रेपो दरात वारंवार वाढ करण्यात येत आहे. आता ही रेपो दरात वाढीची शक्यता आहे. RBI 7 डिसेंबर रोजी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करु शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना झटका बसेल.
मे महिन्यापासून रेपो दरात सातत्याने वाढ होत आहे. आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. आतापर्यंत रेपो दर 5.90% वर आला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करत असते.
अर्थतज्ज्ञांच्या मते, डिसेंबर महिन्यात रेपो दरात 35 बीपीएसने वाढ होईल. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढेल. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो. आरबीआयच्या धोरणामुळे आतापर्यंत व्याजदरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
बँक ऑफ बडोद्याचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी पतधोरण समिती पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचा अंदाज वर्तविला. ही वाढ 0.25 ते 0.35 टक्क्यां दरम्यान असेल. त्यामुळे या आर्थिक वर्षात रेपो दर 6.5 टक्क्यांवर पोहचतील असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रेपो दरात वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.