गेले काही वर्षे सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. आता सोने एक लाख रुपये तोळा हा दर देखील गाठू शकते असे एकीकडे म्हटले जात आहे. अशात काही जणांनी सोने आता त्याच्या पिकवर पोहचले असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 88,310 रुपये म्हणजे ऑल टाईम हायवर गेला होता.गेल्या ७५ दिवसात सोन्याने गुंतवणूकदारांना १४ टक्के रिटर्न दिले आहे. खास बाब म्हणजे या आधी लागोपाट तीन वर्षे सोने गुंतवणूकदारांची वार्षिक 17 टक्के कमाई होत आहे. ही कमाई निर्देशांकाच्या ११.५ टक्के रिटर्नच्या तुलनेत खूप जादा आहे. सध्या सध्याच्या काळात सोने शॉर्ट आणि लाँग टर्म दोन्ही बाबतीत शेअर बाजारावर भारी पडले आहे. परंतू ही तुलना तेव्हा होत आहे जेव्हा सोन्याच्या दराने नवीन उंची गाठली आहे. तर शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे.
आता यामुळे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की गुंतवणूकदारांनी सोने विकून नफा कमावण्याची वेळ आली आहे.कारण आधीच्या इतिहासात असे घडले आहे. लागोपाठ तेजीनंतर सोन्याच्या दरात नंतर घसरण झाली तेव्हा सोन्याला पुन्हा त्याच उंचीवर पोहचायला खूप वेळ लागला होता. चला तर जाणकारांच्या माहीती आणि आकड्यांचे गणित समजण्याचा प्रयत्न करुयात.. अखेर सोन्याच्या गुंतवणूकदारांना कोणत्या पद्धतीचे पावले उचलायला हवीत हे पाहूयात….
सोन्याच्या दरातील ही मोठी झेप लवकरच पिकला पोहचून त्याची घसरण सुरु होणार आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय वाटाघाटींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव निवळण्यास मदत करु शकतात.तसेच महागाई देखील नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरण होऊ शकते असे क्वांटम एएमसीचे सीईओ चिराग मेहता यांनी म्हटले आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजने असे म्हटले आहे की मजबूत डॉलर आणि अमेरिकन फेड बँका यांच्याकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी असून त्यामुळे सोन्याच्या दरावर अंकुश लागण्याची शक्यता आहे.
नजिकच्या काळात सोन्याचा रिस्क – रिटर्न पेऑफच्या पक्षात नाही. जर सोन्याचा गेला किंमत वाढण्याचा हंगामाला जर इंडिकेटर मानले तर हा ओव्हरबॉट होताना दिसेल. उदाहरणासाठी पाहीले तर १९७० च्या दशकात सोन्याच्या किंमतीचे विश्लेषण केले तर समजते की सोन्याच्या किंमती आणि त्याच्या २०० दिवसांच्या मुव्हींग एव्हरेजच्या दरम्यान सध्याचे अंतर असमान्य रुपाने मोठे आहे. या पॅटर्नने नेहमी सोन्याच्या किंमतींत खूप काळपासून कमजोरीच्या सुरुवातीचे संकेत दिले असून जे अत्यंत लाभाच्या काळानंतर होतो.
सध्या सोने इक्वीटीपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसत आहे.परंतू येत्या दिवसात याच्या उलट होऊ शकते असे एडलवाईस एसेट मॅनेजमेंटचे एसव्हीपी निरंजन अवस्थी यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की १९९९ मध्ये सेन्सेक्स – टू – गोल्ड रेषोचे विश्लेषण असे दर्शवितो की जेव्हा हा रेषो १ ने कमी होतो. तेव्हा इक्वीटी येत्या तीन वर्षांत चांगली प्रदर्शन करु शकते. आणि जेव्हा हे प्रमाण १ हून अधिक असते तेव्हा सोने येत्या तीन वर्षात इक्वीटी पेक्षा चांगली कामगिरी करु शकते. सध्याचा रेषो ०.९६ या दीर्घकालिक सरासरी पेक्षा खाली आहे. याचा अर्थ सोन्याच्या किंमती जास्त आहेत. इक्वीटी येत्या तीन वर्षांत सोन्याच्या पुढे जाऊ शकते. ऐतिहासिक पॅटर्न सांगतो की इक्वीटीसारखा सोने देखील ठराविक सायकल मधून जाते. खूपच जास्त प्रोफीट मिळाल्यानंतर घसरणीचा मोठा अवधी देखील पाहायला मिळतो. वास्तविक, जेव्हा सोन्याच्या दरात घसरण होते, तेव्हा गुंतवणूकदारांसाठी हे खूपच दुखद राहीले आहे.
जानेवारी १९८० मध्ये सोन्याचे दर ऑल टाईम हायवर होते. ( पिकवर ) त्यानंतर अचानक दोन वर्षे सोन्याच्या किंमतीत ५६ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे.त्यानंतर पुन्हा सोन्याला भाव मिळण्यासाठी दहा वर्षे लागली.त्यानंतर गोल्ड पिक नोव्हेंबर १९८९ मध्ये पाहायला मिळाला. असाच प्रकार साल २०१२ मध्ये पाहायला मिळाला. नोव्हेंबर २०१२ मध्ये सोन्याचे दर त्याच्या पिकवर पोहचले होते. त्यानंतर अडीच वर्षे ३० टक्के घसरण पाहायला मिळाली.नवा पिक गोल्ड साल २०१९ मध्ये सहा ते सात महिन्यांनी पहायला मिळाला. याआधी फेब्रुवारी १९९६ मध्ये देखील गोल्ड आपल्या पिकला स्पर्श केला होता. त्यानंतर साडे तीन वर्षे घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढायला ६ वर्षे ४ महिन्यांचा वेळ लागला.
सोमवारी देशाच्या कमोडीटी मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. देशाच्या कमोडीटी मार्केटमध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने दर ११.२० वाजता १९१ रुपयांच्या घसरणीसह ८७,८०० रुपयांवर होते. मात्र, बाजाराचे कामकाज सुरु झाल्यानंतर सोन्याची किंमत ८७,६९२ रुपये प्रति दहा ग्रॅम अशा लोव्हर लेव्हल पोहचली होती. खास बाब म्हणजे शुक्रवारी सोन्याच्या दर ८८,३१० रुपयांसह लाईफ टाईम हायवर पोहचला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमती ५१० रुपयांची घसरण झाली आहे. आजचा दिवस सोडला तर सोने गुंतवणूकदारांना सुमारे १४ टक्के परतावा मिळाला आहे. याचा अर्थ सोन्याच्या किंमतीत यावर्षी १०५,०० रुपयांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे.