नवी दिल्ली : फेक विमा पॉलिसी विकणाऱ्या बंगळुरुतील एका मोटर वाहन विमा कंपनीचा आयआरडीएआयने पर्दाफाश केला आहे. बंगळुरुस्थित डिजिटल नॅशनल मोटर इन्शुरन्स कंपनी फेक पॉलिसी विकत असून कुणीही कंपनीच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आयआरडीएआयने केले आहे. सदर कंपनीला विमा पॉलिसी विकण्यासाठी कोणताही परवाना देण्यात आला नाही. ही कंपनी फेक असून कुणीही या कंपनीच्या पॉलिसी घेऊन नका असा सावधानीचा इशारा आयआरडीएआयने दिला आहे. (Fake insurance company exposed by IRDAI)
सदर कंपनीबाबत आयआरडीएआयने 11 फेब्रुवारी रोजी एक पब्लिक नोटीस जारी केली आहे. यात नोटीसीत #DNMIco.ltd पोर्टल ऑफिस, कृष्णा राजा पुरम, इंश्युरन्स इन्फो बिल्डिंग, देवसंदरा, बंगळुरु- 560036′ संचालित डिजिटल नॅशनल मोटर इंश्युरन्स कंपनी वाहनांची फेक विमा पॉलिसी विकत असल्याचे आयआरडीएआयने म्हटले आहे.
आयआरडीएआयच्या माहितीनुसार या कंपनीला विमा पॉलिसी विकण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नाही. कोणत्याही प्रकारची पॉलिसी विकण्याचा परवाना कंपनीला देण्यात आला नसून कंपनीच्या नोंदणीलाही मंजुरी देण्यात आली नाही. आयआरडीएआयने पब्लिक नोटीसमध्ये कंपनीचा ई-मेल आयडी digitalpolicyservices@gmail.com आणि वेबसाईट https://dnmins.wixsite.com/dnmins चा उल्लेख करीत सामान्य लोकांना कंपनीच्या भूलथापांना बळी न पडून विमा पॉलिसीबाबत कोणतेही आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन केले आहे.
फेक पॉलिसीद्वारे वाहन धारकांची होत असलेली फसवणूक लक्षात घेत आयआरडीएआयने वाहन विमा पॉलिसी ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विमा पॉलिसीसाठी कोणताही कागदी व्यवहार होणार नाही. कमी पैशात पॉलिसीची ऑफर देऊन ग्राहकांची फसवणूक होते. ग्राहक जेव्हा विमा क्लेम करायला जातात तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. देशभरातील अशा अनेक घटना समोर आल्यानंतर ग्राहकांच्या हितासाठी आयआरडीएआयने ऑनलाईन विमा पॉलिसी नूतनीकरण अनिवार्य केले आहे. (Fake insurance company exposed by IRDAI)
Video : Kalyan | नॉयलॉनच्या दोरीमुळे दोघांचा मृत्यू; अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आरपीआयची मागणी #Kalyan pic.twitter.com/dqUpvbhmEa
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2021
इतर बातम्या
धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडलं, या प्रकरणातही चौकशीत सत्य बाहेर येईल : हसन मुश्रीफ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, आत्महत्या नैराश्यातून; पोलिसांचा पंचनामा