नवी दिल्ली | 1 February 2024 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टटॅग केवायसी पूर्ण करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. फास्टटॅग संदर्भातील घोळ थांबविण्यासाठी आणि एक वाहन, एक फास्टटॅगचा वापर वाढविण्यासाठी एनएचएआयने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. यासाठी प्राधिकरणाने 31 जानेवारी ही अंतिम मुदत असल्याचे जाहीर केले होते. पण आता ही तारीख वाढविण्यात आली आहे. आता ग्राहकांना 29 फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅगचे ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर तुमचे फास्टटॅग अपडेट केले नसेल तर ते डिएक्टीवेट होईल.
तीन वर्षांपासून फास्टटॅग दिमतीला
फास्टटॅग 15 फेब्रुवारी 2021 पासून चारचाकी वाहनांना अनिवार्य करण्यात आले आहे. टोल नाक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी फास्टटॅगचा वापर वाढविण्यात आला. यामुळे इलेक्ट्रॉनिक टोल जमा करण्याला गती आणि सुसूत्रता आली. प्रत्येक वाहनाला फास्टटॅग अनिवार्य असताना, एकच फास्टटॅग अनेक वाहनांसाठी वापरल्या जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ई-केवायसीचे हत्यार उपासण्यात आले आहे.
नाहीतर दुप्पट टोल
जर फास्टटॅगच अपडेट केले नाही तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट कर मोजावा लागेल. NHAI च्या फास्टटॅग विभागात यासंबंधीची सूचना आणि इतर अपडेट तुम्हाला माहिती करुन घेता येईल. सिंगल फास्टटॅगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अपडेट करा केवायसी
जर फास्टटॅगचे तुम्ही केवायसी अपडेट केले नसेल तर त्वरीत करुन घ्या. केवायसी अपडेट झाले की नाही, हे तपासण्यासाठी fastag.ihmcl.com या संकेतस्थळावर लॉग इन करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल आणि पासवर्ड अथवा ओटीपी द्वारे तुम्ही लॉग-इन होऊ शकता. डॅशबोर्डवर माय प्रोफाईलवर क्लिक करा. योग्य ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला स्टेट्स चेक करता येईल.
कोणती लागतात कागदपत्रं
अशी आहे सोपी पद्धत