नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे (Inflation)हैराण झालेल्या देशातील जनतेला आधार देण्याचे काम केंद्र सरकारकडून या वर्षात दोन वेळा झाले आहे. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केल्याने यावेळी पेट्रोल (Petrol) 8 रुपये आणि डिझेलच्या (Diesel)6 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईत भरडल्या जाणाऱ्या जनतेला दिलासा मिळत आहे. तेव्हापासून भाव खाली आले आहेत. दरम्यान आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे. तर मुंबईत 111.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर किंमत आहे. डिझेलबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेलचा दर 97.28 रुपये, कोलकात्यात 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारने व्हॅटमध्ये कपात केली आहे. राजस्थानमध्ये पेट्रोलवर प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी व्हॅट कपात जाहीर करण्यात आली आहे. केरळ राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 1.36 रुपयांनी कपात केली आहे. ओडिशा सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.23 रुपयांनी आणि डिझेलवरील 1.36 रुपयांनी कमी केला आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये प्रतिलिटर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपयांची कपात केली आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOC) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://iocl.com/petrol-diesel-price
अलीकडे करण्यात आलेल्या बदलांमुळे बँक ऑफ बडोदाचा विश्वास आहे की चलनवाढीचा दर 0.40 बेसिस पॉइंटने खाली येईल. एचडीएफसी बँक डायरेक्टने महागाईचा अंदाज 20 बेसिस पॉईंटने कमी येईल असे सांगत आहे. तर क्वांट इको डायरेक्टचा अंदाज 25 बेसिस पॉईंट, कोटक महिंद्रा बँकेचा अंदाज 30-35 बेसिस पॉइंट, नोमुरा 0.30 टक्के ते 0.40 टक्के असा अंदाज आहे. ICRA चा अंदाज आहे की मे महिन्यात महागाई दर 6.5 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो.
एचडीएफसी बँकेचे प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता सांगतात की मे महिन्यातील आता 10 दिवसही शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीत नुकत्याच झालेल्या निर्णयाचा परिणाम कमी होईल. उत्पादन शुल्कातील कपातीचा परिणाम जून महिन्यात दिसून येईल. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की, शुल्कात कपातीसोबतच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या वाढीचाही महागाई कमी होण्यावर परिणाम होईल. जागतिक पुरवठा साखळीची समस्या आणि कोरोनामुळे चीनमध्ये लॉकडाऊनचाही महागाई वाढण्यात महत्त्वाचा वाटा आहे.