गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खाद्यतेलाने आनंदवार्ता आणली आहे. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दाम आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. लहरी निसर्गाने त्यात खुटी ठोकली असली तरी आयातीने सरकारला तारले आहे. गेल्या एक वर्षांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील खाद्यतेल-बियाणे बाजारात सर्व तेलाच्या किंमतीत बदल दिसून आला. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, कच्चे पाम तेल, पामोलिन तेल, कापसाच्या तेलात तेजीचे सत्र दिसून आले.
मोहरीची आवक वाढली
बाजारातील तज्ज्ञांनुसार, या पुनरावलोकनाधीन आठवड्यापासून मोहरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. 16-16.25 लाख पोतीपर्यंत मोहरी बाजारात दाखल झाली आहे. हरियाणा आणि श्रीगंगानगर येथील मोहरीचे पीक थोडे उशीरा येते. एप्रिलच्या अखेरपर्यंत मोहरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना ही आवक 9-9.25 लाख पोत्यांवरच स्थिरावली.
MSP वर सरकारकडून खरेदी
सोयाबीनचे दाम घसरले
सूत्रांच्या माहितीनुसार, खाद्यतेलाचा पुरवठा अद्याप वाढलेला नाही. पण घाऊक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. सोयाबीनचे दाम घसरल्याने शेतकरी हैराण आहे. सध्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा पण सोयाबीनचा भाव कमी आहे. अनेक बाजारात सध्या सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा साठा असल्याचे समोर आले आहे. आयातीत तेलाच्या किंमती पण स्वस्त झाल्याने बाजारात पुन्हा तेलाचे दाम कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.