Budget 2021 | आजपासून ‘या’ पाच गोष्टी बदलणार, पाहा तुमच्या खिशावर किती भार वाढणार?

| Updated on: Feb 01, 2021 | 3:17 PM

आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पाडण्याचं तसेच काही बाबातीत सूट देण्याचं काम करणार आहेत.

Budget 2021 | आजपासून या पाच गोष्टी बदलणार, पाहा तुमच्या खिशावर किती भार वाढणार?
Follow us on

Budget 2021 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Five Changes After Budget 2021 Day) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला. भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार आहे (Five Changes After Budget 2021 Day).

त्याशिवाय, आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पाडण्याचं तसेच काही बाबातीत सूट देण्याचं काम करणार आहेत.

गॅसचे दर बदलणार –

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तसेच व्यवसायिक स्तरावरील गॅस वापराचे दर बदलतात. आजही गॅसचे नवीन दर जाहीर झालेत. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये गॅसदरांमध्ये काही बदल करण्यात आले नव्हते, तसेच, या महिन्यातही घरगुती गॅसच्या दरांमध्ये बदल झालेले नाहीत. नवी दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 694 रुपये, तर मुंबईत 720.50 रुपये इतकी असेल.

पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही –

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाचा बदल आजपासून होणार आहे. पंजाब नॅशनल बँकने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेत बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्समधून पैसे काढता येणार नाहीत. ज्या एटीएम मशीनमध्ये व्यवहार सुरु असतानाच कार्ड आतमध्ये न राहता डेटा वाचून बाहेर येतं अशा मशीनमधून आजपासून पीएनबीच्या ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत.

पीएमसी बँकेसाठी मागवेल प्रस्ताव –

आर्थिक घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने बँकेला पुन्हा नव्या उभं करण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील गुंतवणुकीचे प्रस्ताव 1 फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आवाहन केलं आहे. काही गुंतवणुकदारांनी सेंट्रम ग्रुप भारतपीसोबत मिळून बँकेला आधीच प्रस्ताव दिला आहे (Five Changes After Budget 2021 Day).

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात –

एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणांची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस फेब्रुवारी महिन्यापासून 27 मार्चपर्यंत त्रिची आणि सिंगापूरदरम्यान रोज उड्डाण करणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस कुवैत विजयवाडा, हैदराबाद, मंगळूरु, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आणि कोच्चीसारख्या ठिकाणांहून विमानसेवा परुवणार आहे.

आजपासून काय महाग काय स्वस्त? –

काय स्वस्त?

सोने-चांदी

भारतीय बनावटीचे मोबाईल

चप्पल

नायलॉन – कस्टम ड्युटी कमी करुन 5 टक्क्यांवर

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

स्टील – कस्टम ड्युटी कमी करुन 7.5 टक्क्यांवर

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट – कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल- इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

मोबाईल ऑटो पार्ट – काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली

परदेशी मोबाईल आणि चार्जर

तांब्याचे सामान

जेम्स स्टोन – कस्टम ड्युटी वाढवली

इथाईल अल्कोहोल

Five Changes After Budget 2021 Day

संबंधित बातम्या :

Budget 2021 : भारत 5 वर्षात ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल; गडकरींकडून वाहन स्क्रॅप धोरणाचं कौतुक

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Police चा परिणाम काय?

Banking Budget 2021: दोन सरकारी बँका विकणार; सीतारामन यांची मोठी घोषणा