Petrol Diesel Rate Today : जागतिक बाजारात कच्चा तेलाच चढउताराचे सत्र असले तरी भाव 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. पण या एका कारणामुळे पेट्रोल-डिझेल महागले आहे...
Ad
आजचा भाव घ्या जाणून
Follow us on
नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil) चढउताराचे सत्र आहे. पण तसा भावात मोठा बदल झालेला नाही. ओपेक प्लस संघटनांनी धोरणात केलेल्या बदलाचा मोठा फायदा सर्वच देशांना झाला. सध्या भाव 75 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. शेजारी असलेल्या कंगाल पाकिस्तान सरकारने जनतेसाठी इंधनाच्या किंमतीत मोठी कपात केली. 31मे पर्यंत त्यांना दर कपातीचा दिलासा मिळेल. भारतात आजपासून 2000 रुपयांच्या गुलाबी नोटेच्या पाठवणीचा महोत्सव सुरु होत आहे. काही पेट्रोल पंपावर दोन हजारांच्याच नोटा जास्त येत असल्याने टाकी फुल्ल करुन घ्या अथवा कमिशन द्या असा मामला सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) अशी कृत्रिम वाढ झाली आहे.
क्रूड ऑईलचा भाव
आज 23 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.99 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 76.19 डॉलर प्रति बॅरल झाले.