नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार सुरु आहे. त्याचा परिणाम देशाती विक्री होणाऱ्या इंधनावर होतो. भारतात दरदिवशी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येतात. हा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलांच्या (Crude Oil Price) आधारे ठरविण्यात येतो. 3 मार्च, 2023 रोजी शुक्रवारी क्रूड ऑईलच्या किंमतीत चढउतार सुरुच आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) आज 0.24 टक्क्यांची किंचित घसरण दिसून आली. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात (Brent Crude Oil) 0.19 टक्क्यांची वाढ झाली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल 77.97 डॉलर तर ब्रेंट क्रूड ऑईल 84.47 डॉलर प्रति बॅरलवर विक्री होत आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.
फेब्रुवारीत रशियाचे इंधन तेलाची आयात घसरली. एका महिन्यात प्रत्येक दिवशी केवळ 123,000 बॅरल तेल आयात करण्यात आले. गेल्या महिन्यात जानेवारीच्या तुलनेत 28 टक्के कमी कच्चे तेल आयात करण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताने रशियाकडून जानेवारीच्या तुलनेत कमी कच्चे तेल आयात केले. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव काय
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 106.97 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.73 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
अमरावतीत 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.18 आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.23 तर डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.59 तर डिझेल 95.05 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 105.98 आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.59 रुपये तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर आहे