Marathi News Business Fluctuations in crude oil, which city is expensive, which city is cheap, know the price in a minute know the petrol diesel price today
Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलचा भाव अपडेट! तुमच्या खिशाला इतकी झळ
Petrol Diesel Rate Today : राज्यातील काही शहरात पेट्रोल-डिझेल आज महागले. तर काही शहरात भाव कमी झाला. तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या एका एसएमएसवर
Ad
Follow us on
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाने(Crude Oil Price) मामुली उसळी घेतली. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Rate Today) जाहीर होतो. एका एसएमएसवर तुमच्या शहरातील इंधनाचे भाव तुम्हाला जाणून घेता येतील.
कच्चा तेलात चढउतार
आज कच्चा तेलात वाढ झाली. 7 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.36 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 71.83 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तराच्या आसपास खेळत आहे.