आता आकाशातून करा कारची सफर
Image Credit source: SkyDrive
तुम्हाला लवकरच आकाशातून विमानच नाही तर कार पण उडताना दिसतील. जगभरात फ्लाईंग कार तयार करण्याचा प्रयोग सुरु आहे. भारतात पण लवकरच हवाई कारमधून उडण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने स्काईड्राईव्ह इंकसोबत त्यासाठी करार केला आहे. त्यांनी फ्लाईंग कारचे उत्पादन सुरु केले आहे. जपानच्या शिजुओका प्रदेशात इवाता शहरात सुझुकीच्या प्रकल्पात या कारचे उत्पादन करण्यात येत आहे. या ठिकाणाहून एका वर्षांत 100 इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (eVOTL) फ्लाईंग कार तयार होतील. या उडणाऱ्या कार पूर्णतः इलेक्ट्रिक आणि ऑटोमॅटिक असतील.
गेल्या वर्षीच झाला करार
फ्लाईंग कारला ॲडव्हान्स एअर मोबिलिटी (AAM) तसेच अर्बन एअर मोबिलिटी (UAM) या नावाने ओळखले जाते. जून 2023 मध्ये सुझुकी आणि स्काईड्राईव्हची उपकंपनी स्काय वर्क्स इंकच्या स्काय ड्राईव्हसाठी (SD-05 टाईप) उत्पादन करण्यासाठी करार केला होता.
सुझुकी-स्काय ड्राईव्हची फ्लाईंग कार
- eVOTL फ्लाईंग कार वीजेवर चालणारे ड्रोन आहे. यामध्ये ऑटोपायलट सारखे ऑटोमॅटिक फीचर्सचा समावेश आहे. स्काईड्राईव्ह ई-व्हीटीओएल एक कॉम्पॅक्ट, तीन आसनी ड्रोन आहे. हे एका हेलिकॉप्टरप्रमाणेच काम करते. ते सरळ जमिनीवर उतरणे आणि उडण्यासाठी सक्षम आहे.
- या फ्लाईंग कारची रेंज 15 मिनिटांची असेल. 15 मिनिटात ही कार जवळपास 15 किमीचे अंतर कापते. या कारची गती ताशी 100 किमी इतकी आहे. कंपनी या कारची रेंज 40 किमीपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
- गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक वाहतूक व्यवस्थेची मागणी उच्चांकावर आहे. त्यामुळे शहरी भागात वाहतूक कोडींची समस्या तयार झाली आहे. त्यावर तोडगा म्हणून भविष्यात सार्वजनिक वाहतूकीसाठी एअर टॅक्सीची गरज भासणार आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढत झटपट दुसरे शहर गाठणे यामुळे शक्य होईल.
भारतात फ्लाईंग कार
- स्काईड्राईव्ह भारतात फ्लाईंग कारची सुरुवात करणार आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 मध्ये कंपनीने फ्लाईंग कार सादर केली होती. याशिवाय स्काईड्राईव्ह इंकने 2027 पर्यंत गुजरात राज्यात फ्लाईंग कारच्या चाचणीची घोषणा केली आहे. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी (DST) एक करार पण करण्यात आला आहे.
- या करारानुसार चाचणी व्यतिरिक्त भारतत स्कायड्राईव्ह व्यवसाय वाढीला लागण्यासाठी खास संधी पण निर्माण करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. जपानच्या एअरक्रॉफ्ट कंपनीने भारतात स्कायड्राईव्ह फ्लाईंग कारसाठी एका एमओयूवर पण स्वाक्षरी केली आहे.