मॅडमजी, एवढा टॅक्स कसा भरू? जिवंत कसा राहू?, शेअर मार्केटमधील किंगचा सवाल; जीएसटीवरून अर्थमंत्र्यावर हल्ला

| Updated on: Dec 24, 2024 | 3:22 PM

प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांनी भारताच्या वाढत्या कर पद्धतीवर टीका करणारे एक हिंदी गाणे सादर केले आहे. "एफएम जी, एफएम जी, इतना टैक्स मैं कैसे भरूं" या गाण्यातून त्यांनी एसटीटी, एसटीजी, एलटीसीजी आणि डिव्हिडंड टॅक्समधील वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केडिया यांच्या या गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. ते 19 व्या वर्षापासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचे पोर्टफोलियो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

मॅडमजी, एवढा टॅक्स कसा भरू? जिवंत कसा राहू?, शेअर मार्केटमधील किंगचा सवाल; जीएसटीवरून अर्थमंत्र्यावर हल्ला
विजय केडिया
Follow us on

शेअर मार्केटमधील किंग आणि गुंतवणूकदार विजय केडिया नेहमीच यूनिक आणि क्रिएटिव्ह गाण्यासाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टॅक्सबाबतचं गाणं सादर केलं आहे. त्यांनी या गाण्याच्या माध्यामातून देशात सातत्याने वाढत चाललेल्या टॅक्स सिस्टीमवर जोरदरा हल्ला चढवला आहे. ‘FM जी, FM जी, इतना टैक्स मैं कैसे भरूं.’ असं या गाण्याचं नाव त्यांनी ठेवलं आहे. हे गाणं हिंदीत आहे. केडिया यांच्या या गाण्यावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गाण्यातून हल्ला

विजय केडिया यांनी गाण्यातून हल्लाबोल चढवला आहे. “FM जी, FM जी, एवढा टॅक्स कुठून भरू? एसटीटी, एसटीजी, एलटीसीजी वाढलं, काय सांगू? वर डिव्हिडंडवर दोन दोन टॅक्स सुद्धा मी पे करू, मॅडम जी, मॅडम जी, आता जिवंत कसा राहू?, असे या गाण्याचे बोल आहेत. पुढच्या ओळीत, “कठिण आहे हा बिजनेस, किती रिस्क घेत असतो, त्या बदल्यात मला डायबिटीज आणि बीपी मिळतो. हे सोपं नाही हो जी, एवढी एंक्झायटी कशी सहन करू. मॅडम जी, मॅडम जी, आता जिवंत कसा राहू” असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ टाकून एवढ्या मोठ्या टॅक्सच्या बोझ्यामुळे लोक जिवंत कसे राहतील? असा सवाल केला होता. या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.

19 व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजट 2024-2025मध्ये कॅपिटल गेन टॅक्स सिस्टिममध्ये मोठे बदल केले होते. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सच्या दरांना 15 टक्क्याहून वाढवून 20 टक्के केलं होतं. त्याशिवाय लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सवरही 2.5 टक्क्याची वाढ केली होती. ती 10 टक्क्याने वाढून 12.5 टक्के झाली होती. एलटीसीजी टॅक्स सवलतीची मर्यादा एक लाखाने वाढवून 1.25 लाख रुपये करण्यात आली होती.

विजय केडिया यांचा पोर्टफोलियो भारतात सर्वाधिक फॉलो केला जाणारा फोर्ट फोलियो आहे. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. 1992मध्ये केडिया सेक्युरिटीजची त्यांनी सुरुवात केली होती.