Petrol Diesel Price Today : राज्यातील शहरात आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी खिसा इतका खाली करावा लागणार आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.
Follow us on
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजताच पेट्रोल-डिझेलचे भाव(Petrol Diesel Price) जाहीर केले. जागतिक बाजारात कच्चा तेलात मामूली घसरण दिसून आली. ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन घटविण्याच्या घोषणेनंतर सगळे देश चिंतेत होते. पण अर्धा मे उलटून गेला तरी, या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने सर्वांनाच हायसे वाटले. त्यामुळे इंधनाचे दर भडकण्याची भीती गायब झाली आहे. राज्यातील शहरात आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी खिसा इतका खाली करावा लागणार आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.
कच्चा तेलाची किंमत
आज 19 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.84 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 75.89 डॉलर प्रति बॅरल झाले.