नवी दिल्ली : फोर्ब्सच्या नवीन यादीत मुकेश अंबानी यांनी स्थान पटकावले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani Asia’s Richest) या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे स्टिव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज, सर्गेई ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, डेल टेक्नॉलॉजीचे मायकल डेल यांना मात दिली. अंबानी गेल्या वर्षी या यादीत 90.7 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत 10 व्या क्रमांकावर होते. या यादीत खरी चर्चा झाली ती गौतम अदानी यांची, त्यांचा क्रमांक कितवा आहे, याची गुंतवणूकदारांनाच नाही तर सर्वांनाच उत्सुकता होती. हिंडनबर्ग (Hindenburg Report) वादळात त्यांच्या साम्राज्याला झटका बसला. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.
गौतम अदानी कितव्या क्रमांकावर
या यादीत गौतम अदानी कितव्या क्रमांकावर आहेत. याची सर्वांनाच उत्सुकता होती. अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलिनिअर्सच्या यादीत 24 व्या क्रमांकाहून थेट 27 व्या क्रमांकावर पोहचले. फोर्ब्सनुसार अदानी यांची एकूण संपत्ती 43.1 अब्ज डॉलर आहे. 24 जानेवारी रोजी अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गने अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात अदानी समूहाने अनेक अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हा रिपोर्ट सादर करण्यापूर्वी त्यांची संपत्ती 126 अब्ज डॉलर होती.
अंबानी यांनी मारली बाजी
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी या यादीत स्थान पटकावले आहे. मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींमध्ये 9 व्या स्थानावर पोहचले आहे. 65 वर्षांचे भारतीय उद्योगपती अंबानी यांची एकूण संपत्ती 83.4 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सनुसार, गेल्या वर्षी 2022 मध्ये अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक महसूल जमा करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. नवीन यादीनुसार, मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे स्टिव्ह बाल्मर, गुगलचे लॅरी पेज, सर्गेई ब्रिन, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, डेल टेक्नॉलॉजीचे मायकल डेल यांना मागे सारले आहे. गेल्या वर्षी या यादीत 90.7 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत 10 व्या क्रमांकावर होते.
यादीतील टॉप-3
फोर्ब्सच्या अहवालानुसार, या वर्षी जेफ बेजोस (Jeff Bejos) यांना सर्वाधिक नुकसान झाले. त्यांची कंपनी Amzon च्या शेअरमद्ये 38 टक्क्यांची घसरण झाली. श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत 39 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. मस्क यांची एकूण संपत्ती 180 अब्ज डॉलर तर बेजोस यांची एकूण संपत्ती 114 अब्ज डॉलर आहे. तर फ्रांसचे अब्जाधिश बर्नार्ड अरनॉल्ट या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. जगातील 25 अब्जाधिशांची एकूण संपत्ती 2100 अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षी हा आकडा 2300 अब्ज डॉलर होता.