गेल्या 10 आठवड्यात 1.44 लाख कोटी घटली परकीय गंगाजळी, कशी काय ते पाहा

| Updated on: Oct 14, 2023 | 3:05 PM

देशाचा परकीय गंगाजळी 6 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात 2.17 अब्ज डॉलर घटून 584.74 अब्ज डॉलर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहीती दिली आहे. या आधी देशाची एकूण गंगाजळी 3.79 अब्ज डॉलर घटून 586.91 अब्ज डॉलर झाली होती.

गेल्या 10 आठवड्यात 1.44 लाख कोटी घटली परकीय गंगाजळी, कशी काय ते पाहा
FOREX
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : भारताची परकीय गंगाजळी सातत्याने कमी होत चालली आहे. गेल्या लागोपाठच्या दहा आठवड्यात भारताचे विदेशी चलन भांडार घटत चालले आहे. परकीय गंगाजळीत 1.44 लाख कोटीहून अधिक घट झाल्याचे आकडे सांगत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे परकीय गंगाजळी सहा महिन्यांच्या निच्चांक पातळीवर पोहचली आहे. 6 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलनाचा साठा 2.16 अब्ज डॉलरच्या घसरणीसह 584.75 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. त्याच्या आधीच्या आठवड्यात तो 586.908 अब्ज डॉलर पोहचला होता.

परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर विक्रीमुळे परदेशी चलनसाठ्यात घसरण होत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकने शुक्रवारी परदेशी चलनसाठ्याची आकडेवारी जारी केली होती. त्यामुळे परकीय गंगाजळी 2.16 अब्ज डॉलर घटून 584.75 अब्ज डॉलरवर आले आहे. त्याआधीच्या आठवड्यात देशाची एकूण परकीय गंगाजळी 3.79 अब्ज डॉलरने घसरण होऊन 586.91 अब्ज डॉलर झाले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाची परकीय गंगाजळी 645 अब्ज डॉलर या आतापर्यंतच्या उच्च पातळीवर पोहचली होती. गेल्यावर्षी जागतिक घटनाक्रमाच्या दबावाने आरबीआयने रुपयाची विनियम दरातील घसरण रोखण्यासाठी या गंगाजळीचा वापर केला होता. त्यामुळे परकीय चलनाचे भंडार घटले आहे.

राखीव सोन्याच्या साठ्यात घसरण

रिझर्व्ह बॅंकेच्या साप्ताहिक आकड्यांनूसार 6 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाचा महत्वाचा हिस्सा असलेले परदेशी चलन असेट्स 70.7 कोटी डॉलर घसरुन 519.53 अब्ज डॉलर झाले होते. गोल्ड रिजर्व्हचे मुल्या 1.42 अब्ज डॉलर घटून 42.31 अब्ज डॉलर झाले आहे.