अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यापासून ते रतन टाटा यांच्यापर्यंतच्या बड्या असामी या रंगाचे कपडे टाळतात

| Updated on: Jul 26, 2023 | 10:20 PM

फॅशन ही जरी एखाद्याचा चॉईसचे प्रकरण असते. लोक आपल्या मर्जीनुरुप कपडे घालत असतात, तरी सार्वजनिक जीवनात वावरताना बडी मंडळी मात्र काही रंग जाणीवपूर्वक टाळत असतात.

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यापासून ते रतन टाटा यांच्यापर्यंतच्या बड्या असामी या रंगाचे कपडे टाळतात
mukesh ambani and ratan tata
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 26 जुलै 2023 : आपला भारत असो किंवा परदेश उद्योगपती किंवा अब्जाधीश व्यक्ती नेहमीच सौम्य रंगाचे कपडे किंवा सूट परिधान करीत असतात. बिझनेसमन सत्या नडेला किंवा सुंदर पिचई हे देखील कधी भडक रंगाचे कपडे घातलेले तुम्हाला दिसणार नाही. प्रसिध्द व्यक्ती नेहमीच सोबर रंगाचे कपडे परिधान करीत असतात. ते त्यांच्या बिझनेस वाढविण्यात सतत व्यग्र असतात. त्यामुळे स्वत:ला ते नेहमीच पोशाखात राहातात. मार्क झुकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स तर साध्या टीशर्टमध्येही ऑफीसला जाताना तुम्ही पाहिले असावेत.

रंगाचे असतात अनेक अर्थ

अनेकवेळा रंगाच्या बाबतीत जनमानसात एक धारणा झालेली असते. उदाहरणार्थ पांढऱ्या रंगाचा विचार केला तर हा एक क्लासिक कलर असून तो शुद्धता, स्वच्छता आणि सोफिस्टीकेटेड वाटतो. तर काळा रंग हा पॉवर, मिस्ट्री आणि तुमच्या निष्ठेचे प्रतिक वाटतो. तर निळा रंग हा तुमचा आत्मविश्वास आणि अधिकाराचे प्रतिक वाटतो. ब्रिटीश राजघराण्यातील लोक नेहमी रॉयल ब्ल्यू रंगाचे कपडे घातलेले दिसतात.

श्रीमंत दिसायचे असेल तर हे रंग टाळा

फॅशन ही जरी एखाद्याचा चॉईसचे प्रकरण असते. लोक आपल्या मर्जीनुरुप कपडे घालत असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. परंतू तुम्हाला जर श्रीमंत दिसायचे असेल किंवा रुबाबदार दिसायचे असेल तर कपाटात पाच रंगाचे कपडे नसलेलेच बरे..

1. नियॉन आणि फ्लोरोसेंट शेड्स

2 . मल्टी कलर प्रिंट आणि पॅर्टनवाली ड्रेस

3. पेस्टल ड्रेस ( बेबी पिंक, मिंट ग्रीन आदी )

4. टक्सेडो, शायनी आणि मॅटलिक लुक असणारा ड्रेस

5. आवश्यकतेपेक्षा जादा फेड कलर असणारा ड्रेस