TCS Dress Code | शर्ट ते साडी, अशा पेहरावात दिसतील कर्मचारी, टाटाचे स्टाईल स्टेटमेंट व्हायरल

| Updated on: Oct 19, 2023 | 10:26 AM

TCS Dress Code | भारतातील मोठी आयटी कंपनी TCS ने कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. त्याची सध्या चर्चा सुरु आहे. यामध्ये आधुनिकतेसह पारंपारिक पेहरावाला पण प्राधान्य देण्यात आले आहे. आयटी सेक्टरमध्ये अशाच प्रयोगाची सध्या चर्चा सुरु आहे. कसे आहे टाटाचे स्टाईल स्टेटमेंट, कसा आहे ड्रेस कोड?

TCS Dress Code | शर्ट ते साडी, अशा पेहरावात दिसतील कर्मचारी, टाटाचे स्टाईल स्टेटमेंट व्हायरल
चित्र प्रतिनिधीक
Follow us on

नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांसाठी अनेक बदल केले आहेत. त्यात ड्रेस कोडचा नियम सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. आयटी कंपनीने ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयाची उत्सुकता कर्मचारीच नाही तर सर्वसामान्यांना पण आहे. अनेक कंपन्यांमध्ये ड्रेस कोड फॉलो करावा लागतो. टाटाने कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना पोषाखाबाबत मात्र खास जागरुक रहावे लागणार आहे. कार्यसंस्कृती जपण्यासाठी ड्रेस कोडवर भर देण्यात येत आहे. कसा असेल कर्मचाऱ्यांचा पोषाख?

कार्यालयात उत्साह

ड्रेस कोडबाबत कर्मचाऱ्यांना आठवण करुन देण्यात आली आहे. मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडबाबत मेल केला आहे. त्यांनी या ड्रेस कोडचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे काही जण घरुन तर काही जण घर आणि कार्यालयातून काम करत होते. आता सर्वच जण कार्यालयातून उत्साहात सुरुवात करत आहे. अशावेळी टीसीएसचे मूल्य जपण्याची जबाबदारी पण कर्मचाऱ्यांवर आहे. आधुनिकेतसह पंरपरागत पोषाखाचा मिलाप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आधुनिकतेला परंपरेची झालर

या ड्रेस कोडबाबत आधुनिकतेला पंरपरेचा साज घालण्यात आला आहे. पुरुषांसाठी फॉर्मल शर्ट तर महिलांसाठी साडी व इतर फॉर्मल ड्रेसचा पर्याय देण्यात आला आहे. सोमवार ते गुरुवार फॉर्मल तर शुक्रवारी त्यांना कॅझ्युअल्स ड्रेस घालता येईल. बैठकी, कार्यक्रमासाठी वेगळा ड्रेस कोड असेल. ड्रेसचे पालन करणे कर्मचाऱ्यांसाठी गरजेचे आहे. सध्या आयटी क्षेत्रात कपातीचे धोरण राबविण्यात येत आहेत. तर अनेक कर्मचारी इतर संधी शोधत आहेत. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी युनिक आयडिया शोधत आहेत. मूनलाईटिंगची समस्या पण काही कंपन्यांची डोकेदुखी ठरली आहे.

कसा असेल पोषाख

सोमवार ते गुरुवार

  • फॉर्मल मनगटापर्यंतचा फॉर्मल शर्ट, फॉर्मल टाऊझर
  • फॉर्मल स्कर्ट्स अथवा कार्यालयीन पोषाख
  • साडी अथवा गुडघ्यापर्यंतचा कुर्ता
  • फॉर्मल शूज, सँडल

शुक्रवारी असा असेल ड्रेस

  • कॅझ्युअल्स ड्रेस, हाफ शर्ट, कॉलर टी शर्ट
  • कॅझ्युअल्स ट्रॉऊझर, जीन्स पँट
  • कुर्ती, स्कर्ट्स