Public Provident Fund | पीपीएफ योजना (PPF Scheme) तशी अल्पबचतीची आहे. पण योजनेतील अनेक फायदे आणि परतावा पाहून तुम्ही म्हणाल योजना शेअर बाजारापेक्षा कमी नाही. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा (Investment Planning) विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (Public Provident Fund ) गुंतवणूक करण्याचा हा पर्याय तुम्हाला मालामाल तर करेलच पण इतर अनेक सुविधा ही देईल. छोट्या गुंतणुकीतून तुम्हाला मोठा निधी उभारता येईल. पीपीएफ (PPF)खाते सुरक्षित तसेच फायदेशीर आहे. सर्वसामान्य भारतीय त्यासाठी पीपीएफवर विश्वास ठेवतात. केवळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (long term investment) पीपीएफचा पर्याय नाही, तर तुम्हाला कर सवलतीचा हा फायदा मिळतो. या खात्यात कोणत्या सोप्या पद्धतीने पैसे गुंतवू शकता, तसेच कोणते फायदे मिळतात ते पाहुयात.
PPF मध्ये गुंतवणूकदाराला 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येते. या खात्यामध्ये तुम्ही वार्षिक कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. तर या योजनेत 12,500 रुपयांच्या मासिक गुंतवणूक करता येते. PPF ची मॅच्युरिटी 15 वर्षांची आहे. गुंतवणूकदाराची इच्छा असल्यात त्यामध्ये वाढ करता येते. गुंतवणूक 5 आणि आणखी 5 वर्षांपर्यंत वाढवता येते.
योजनेत सलग रक्कम गुंतवणूक करत असाल तर तिसऱ्या आणि सहाव्या आर्थिक वर्षात गुंतवणूकदाराला कर्जाची सुविधा मिळते.
पीपीएफ खात्यातून 7 वर्षांनी रक्कम काढता येते. त्याआधी तुम्हाला पीपीएफमधून रक्कम काढता येत नाही.
या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर कर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करणे केवळ सुरक्षितच नाही तर गुंतवणुकीवर चांगला वार्षिक परतावा देखील मिळतो.
केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत मार्चनंतर व्याज दिले जाते. या योजनेत वैयक्तिक अथवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकता.
तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला किमान 25 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीनुसार 37,50,000 रुपये जमा होतील. यावर 65,58,012 रुपये वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. अखेरीस एकूण 1,03,08,012 रुपये मिळतील.
जर तुमचे पीपीएफ खाते परिपक्व झाले असेल, तर तुम्ही ते बंद करून संपूर्ण रक्कम काढू शकता. मॅच्युरिटीवर मिळणारा संपूर्ण पैसा करमुक्त असेल. याचा अर्थ तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. दुसरीकडे, मुदतीनंतर ही रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. पण तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही पीपीएफमधील रक्कम न काढता ते सक्रिय ठेवणे फायदेशीर ठरते.