India will be a superpower : 2050 पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) बाबतीत भारत अमेरिकेला मागे टाकेल, असा विश्वास आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर या 28 वर्षांत भारतातून गरिबीचं (Poverty) नामोनिशाण संपेल असा विश्वासही अदानींना आहे. नुकतेच मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेल्या गौतम अदानी यांनी एका कार्यक्रमात हा विश्वास व्यक्त केला. सध्या भारताच्या जीडीपीचा आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. अदानींचा मुद्दा योग्य ठरला तर 2050 पर्यंत भारताचा जीडीपी आकार 30 ट्रिलियन डॉलरच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा पुरवठादार कंपनी PwC च्या ”The World in 2050” या अहवालातही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. या अहवालानुसार, 2050 पर्यंत चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीन पाठोपाठ भारताचा (Chaina GDP) क्रमांक राहिल.
येत्या 28 वर्षांत भारताचा जीडीपी सुमारे 25 ट्रिलियन डॉलरने वाढणार आहे, असा विश्वास अदानी समूहाच्या (Adani Group) अध्यक्षांनी व्यक्त केला. सध्या भारताच्या जीडीपीचा (Indian GDP) आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. सध्या भारताच्या जीडीपीचा आकार 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. अदानींचा मुद्दा योग्य ठरला तर 2050 पर्यंत भारताचा जीडीपी आकार 30 ट्रिलियन डॉलरच्या आसपास असेल. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा पुरवठादार कंपनी PwC च्या ”The World in 2050” या अहवालातही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. या अहवालानुसार, 2050 पर्यंत चीन जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. चीन पाठोपाठ भारताचा (Chaina GDP) क्रमांक राहिल. अमेरिका थेट (US GDP) पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरणार आहे.
अदानी म्हणाले, “2050 पासून आपण सध्या सुमारे 10,000 दिवस दूर आहोत. या काळात भारताची अर्थव्यवस्था सुमारे 25 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढेल, असा माझा अंदाज आहे. म्हणजेच 2050 पर्यंत भारताचा जीडीपी दररोज सरासरी 2.5 अब्ज डॉलरने वाढणार आहे. माझा अंदाज असा आहे की, या काळात भारताच्या शेअर बाजाराचे भांडवलही सुमारे 49 ट्रिलियन डॉलरने वाढेल. याचाच अर्थ 2050 पर्यंत भारतीय शेअर बाजारातील ‘भांडवल’ (Market Capital) दररोज सरासरी चार अब्ज डॉलरने वाढेल.
गौतम अदानी पुढे म्हणाले की, आगामी काळात भारत पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत आहे. 2022-23 मध्ये भारतात 100 अब्ज डॉलरची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा एफडीआय (FDI) मिळवणारा देश ठरणार आहे. अदानी यांच्या मते, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, मध्यमवर्गीयांची वाढ, डिजिटल अर्थव्यवस्थेतील गती आणि हवामान स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे या चार प्रमुख गोष्टींचे भांडवल करण्यासाठी भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे.