कमालच झाली, उद्योगपती गौतम अदानी यांची कमाई या देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त

| Updated on: Jul 07, 2023 | 12:33 PM

देशाच्या आर्थिक भरभराटीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यावसायिक परिवारांमध्ये गौतम अदानी यांचा समावेश होतो. त्यांची वर्षाची कमाई ही काही देशांच्या एकूण कमाई पेक्षा जास्त आहे.

कमालच झाली, उद्योगपती गौतम अदानी यांची कमाई या देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त
Gautam Adani
Follow us on

नवी दिल्ली : भारतात अनेक मोठी उद्योजक घराणी आहेत. ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गोदरेज, बजाज, हिंदूजा ( Hinduja Group ) आदींनी भारताच्या उभारणीत मोठे योगदान दिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ( Reliance Industries ) संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोलियम व्यवसायात आपला दबदबा निर्माण केला. टाटा ग्रुप आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताचे नाव गाजवले. तर आघाडीचे उद्योजक गौतम अदानी ( Gautam Adani )  यांनी खाद्य पदार्थ, ऊर्जा आणि पोर्ट खान उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. आजच्या घडीला अदानी यांची कमाई ही जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. तर पाहूयात अदानी कोणकोणत्या व्यवसायात आहेत आणि त्यांची कमाई किती आहे.

गौतम अदानी हे नाव जगभरात गाजत आहे. काही दिवसांआधी जगातीली सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गौतम अदानी 2 ऱ्या स्थानी पोहचले होते. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की गौतम अदानी ग्रुप जगात आपले स्थान भक्कम करत आहे. 2022 साली अदानी यांनी कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले.

ब्लूमबर्गच्या बिलेनियर रिपोर्टनूसार गौतम अदानी यांनी 2022 साली 44 अरब डॉलर कमाई केली. दरम्यान, अमेरिकेच्या शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानी यांना चांगलाच झटका दिला. 2022 साली कमवलेल्या 44 अरब डॉलर पेक्षा जास्त रक्कम अदानी यांनी 5 दिवसात घालवली. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनूसार अदानी यांनी या काळात 39,61,72,49,25,000 रुपये निव्वळ संपत्ती गमावली आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा उभारी घेतली आहे.

जगभरात पसरला आहे व्यापार

गौतम अदानी यांचा व्यवसाय जगभरात पसरला आहे. अदानी यांच्या अनेक कंपन्या आहेत. खाद्य पदार्थ, ऊर्जा क्षेत्र, पोर्ट व्यवसाय, रियर इस्टेट, इंधन अशा अनेक व्यवसायात अदानींचा वावर आहे. एकट्या अदानी पोर्टची मार्केट कॅप पाकिस्तानच्या शेअर मार्केटपेक्षा जास्त आहे. सध्या पाकिस्तानी शेअर मार्केटची वॅल्यू 20 बिलियन डॉलर आहे, तर अदानी पोर्टचे मार्केट कॅप 20 बिलियन डॉलर आहे.

85 देशांच्या जास्त आहे अदानींची कमाई

श्रीमंताच्या यादीत अदानी जगात पहिल्या 20 मध्ये आहेत. त्यांची एक वर्षांची कमाई ही जगातील 85 देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. 2022 साली गौतम अदानींची आर्थिक भरभराट झाली आहे.