Gautam Adani: धक्कादायक, गौतम अदानी यांनी 1 वर्षात जेवढं कमवलं तेवढं फक्त इतक्या दिवसात गमवलं

| Updated on: Feb 02, 2023 | 10:33 AM

गौतम अदानी यांनी मागील वर्षात सर्वाधिक संपत्ती कमावली होती. मात्र सर्वाधिक नेटवर्थ गमावणारेही तेच ठरले. फक्त पाच दिवसात अदानी ग्रुपच्या कंपन्यांचा मार्केट कॅप सुमारे ९० अब्ज डॉलर्सनी घसरला आहे.

Gautam Adani: धक्कादायक, गौतम अदानी यांनी 1 वर्षात जेवढं कमवलं तेवढं फक्त इतक्या दिवसात गमवलं
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः कमावण्यासाठी अनेक पिढ्या जातात पण गमवायला एक क्षणही पुरेसा असतो, असं म्हटलं जातं. मागील वर्षी श्रीमंतांच्या यादीत उच्च स्थान मिळवलेल्या गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गेल्या पाच दिवसात गमावलेल्या संपत्तीबद्दलही असंच काहीसं चित्र दिसून येतंय. मागील वर्षी अब्जाधीशांच्या (Billionaire) रांगेत जाऊन बसलेल्या गौतम अदानींचं नाव सर्वत्र चर्चेत आलं होतं. मात्र हेच अदानी आता नव्या कारणानं चर्चेत आहेत. अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म (Hidenburg Research) ने गौतम अदानी यांना जबरदस्त झटका दिलाय. अदानी यांनी मागील वर्षी 44 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. मात्र गेल्या पाचच दिवसात त्यांना अब्जावधी डॉलर्स गमवावे लागलेत.

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, या वर्षी अदानी यांनी आतापर्यंत 48.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 39,61, 72, 49, 25000  रुपयांचे नेटवर्थ गमावली आहे.

अदानी ग्रुपच्या सर्वच दहा शेअर्समध्ये बुधवारी अचानक घसरण दिसून आली. त्यामुळे एकाच दिवसात त्यांनी 12.5 अब्ज डॉलर्स गमावले. त्यामुळे त्यांची नेटवर्थ ७२.१ अब्ज डॉलर्सपर्यंत एवढीच राहिली.

जगातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी 13 व्या स्थानावर आले. तसेच त्यांच्या आशिया खंडातील यादीतील स्थानालाही धक्का पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त बनलेत.

सर्वच शेअर्सची घसरण

मंगळवारी अदानी ग्रुपच्या दहा पैकी सात कंपन्यांच्या शेअर्सची घसरण दिसून आली. मात्र बुधवारी सगळेच शेअर्स गडगडले. ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राइजेस 25 टक्के तर अदानी पावर 20 टक्के, अदानी पोर्ट्स 20 टक्के, अंबूजा सिमेंट्स 19.26 टक्के तर अदानी टोटल गॅस 10 टक्क्यांनी घसरले. अदानी ग्रीन एनर्जी 8.8 टक्के, एसीसी लिमिटेड6.34 टक्के तर अदानी ट्रान्समिशन 5.75 टक्के तर एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण दिसून आली.

अंबानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर..

तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. बुधवारी त्यांच्या नेटवर्थमद्ये 49.1 कोटी रुपयांची घट दिसून आली. 81 अब्ज डॉलर्स नेटवर्थसह ते श्रीमंतांच्या यादीत 12 व्या तर आशिया खंडात पहिल्या स्थानावर आहेत. अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये या वर्षी 6.08 अब्ज डॉलर्सची घसरण दिसून आली.

टॉप 10 मध्ये कोण कोण?

फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट हे जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहेत. टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क दुसऱ्या स्थानी, अॅमेझॉनचे जेफ बेजोस तिसऱ्या, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स चौथ्या, दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफेट पाचव्या, लॅरी एलिसन सहाव्या, लॅरी पेड सातव्या, स्टीव्ह वाल्मर आठव्या, सर्गेई ब्रिन नवव्या तर कार्लोस स्लिम दहाव्या स्थानी आहेत.