अदान समूहाच्या शेअरमध्ये मंगळवारी जोरदार उसळी आली. गौतम अदानी यांची संपत्ती लागलीच वधारली. अदानींसह गुंतवणूकदारांचा चेहरा पण खुलला. या घडामोडींमुळे श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी मंगळवारी अनेक दिग्गजांना मागे टाकले. कमाईत गौतम अदानी यांनी आघाडी घेतली. त्यांच्या संपत्तीत 4.22 अब्ज डॉलरची भर पडली. भारतीय चलनात 35,23,56,496 रुपयांची भर पडली.
आता इतकी झाली संपत्ती
Bloomberg Billionaire Index ने याविषयीची ताजी अपडेट दिली आहे. आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती आता 99.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 15 व्या स्थानावर आहेत. अर्थात या 35 कोटींच्या कमाईने अदानी यांच्या यादीतील क्रमांकावर कोणताच परिणा झाला नाही. कमाईत लॅरी एलिसन हे दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांच्या संपत्ती 4.05 अब्ज डॉलरची भर पडली. एलिसन या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.
इतर श्रीमंतांची कमाई कशी
एलॉन मस्क यांनी काल 4.05 अब्ज डॉलरची कमाई केली. ते यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 190 अब्ज डॉलर इतकी आहे. ते अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत मंगळवारी 2.94 अब्ज डॉलरने वधारली. त्यांची संपत्ती एकूण 222 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यादीत 11 व्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. त्यांना 1.58 अब्ज डॉलरचा फायदा झाला. आता त्यांच्याकडे 109 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.
अदानी समूहाच्या शेअरची भरारी