Gautam Adani : दुःख भरे दिन बीते रे भैया..श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचं कमबॅक, टॉप-10 पासून केवळ इतके दूर

| Updated on: Mar 09, 2023 | 9:20 AM

Gautam Adani : गौतम अदानी यांच्यावरील संकटांचे ढग हटायला सुरुवात झाली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर जबरदस्त सेटबॅक बसलेल्या अदानी समूहाला आता आनंदवार्ता मिळत आहे. अदानी यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली आहे.

Gautam Adani : दुःख भरे दिन बीते रे भैया..श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचं कमबॅक, टॉप-10 पासून केवळ इतके दूर
Comeback
Follow us on

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावरील संकटांचे ढग हटायला सुरुवात झाली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) जबरदस्त सेटबॅक बसलेल्या अदानी समूहाला आता आनंदवार्ता मिळत आहे. अदानी यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई आता मिळत आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकावरुन अदानी हे थेट 35 व्या स्थानी फेकले गेले होते. त्यांचे शेअरही धडाधड आपटले. काही शेअरमध्ये तर 90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. गुंतवणूकदार हवालदिल झाले. अमेरिकन संशोधन फर्म आणि शॉर्टसेलर हिंडनबर्गच्या आघाताचा जोरदार फटका अदानी समूहाला बसला. सगळीकडूनच समूहाची दमकोंडी झाली. समूहाला बाजारातील त्यांच्या अभिनव योजना एकतर रद्दबातल कराव्या लागल्या अथवा त्या पुढे तरी ढकलाव्या लागल्या. पण आता हा समूह सावरायला लागला आहे. गुंतवणूकदारांना आशा आहे की, लवकरच अदानी टॉप-10 मध्ये कमबॅक करतील.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यावेळी जगातील श्रीमंतांच्या यादीत 22 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 54 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या यादीत अंबानी 83.6 अब्ज डॉलरसह 11 व्या क्रमांकावर आहेत. यादीत राधाकिशन दमानी 98 व्या क्रमांकावर आहेत. तर पहिल्या स्थानावर बर्नार्ड अर्नाल्ट 187 अब्ज डॉलरसह अजूनही हटायचे नाव घेत नाहीये. टेस्लाचे प्रमुख आणि ट्विटरमध्ये धुमाकूळ घालणारे एलॉन मस्क हे 170 अब्ज डॉलरसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. अदानी समूहाचे अनेक स्टॉक्स गेल्या सहा दिवसात जोरदार कामगिरी बजावत आहे. काही शेअर्सला अप्पर सर्किट लागले आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे स्टॉक्स बुधवारी आघाडीसह बंद झाले. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी अदानी इंटरप्रायजेसचे शेअर सलग सहाव्या दिवशीही आघाडीवर होते. गेल्या महिनाभरातील त्यांनी उच्चस्तर गाठला आहे. बीएसईवर अदानी इंटरप्राईजेसचे शेअर आता 2,039.65, पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 712.75, अदानी पॉवर 186.75 रुपये, अदानी ट्रासंमिशन 819.90, अदानी ग्रीन एनर्जी 619.60, अदानी टोटल गॅस 861.90, अदानी विल्मर 461.15 रुपयांवर पोहचले आहेत.

हे सुद्धा वाचा

अदानी समूहावर 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामधील जवळपास 8 टक्के कर्ज पुढील आर्थिक वर्ष संपेपर्यंत चुकते करायचे आहे. विक्रीपूर्वी एईएलमध्ये प्रवर्तकांचा 72.6 टक्के हिस्सा होता. यातील 3.8 कोटी शेअर्स किंवा 3.39 टक्के भागभांडवल 5,460 कोटी रुपयांना विक्री झाले. APSE मध्ये प्रवर्तकांचा 66 टक्के हिस्सा होता आणि त्यांनी 8.8 कोटी समभाग अथवा 4.1 टक्के भागभांडवल 5,282 कोटी रुपयांना विकले.

अदानी समूहाला येत्या महिन्यात 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे कर्ज चुकते करायचे आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे. समूह कर्ज चुकविण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा तर विकणारच आहे. पण ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीवर कर्ज मिळण्यासाठी चाचपणी करणार आहे. मोठ्या रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी कंपनी सध्या पर्याय शोधत आहे. सध्या शेअर बाजारातील सूचीबद्ध असलेल्या चार कंपन्यांमधील काही हिस्सा विक्री करण्यात आला आहे.