नवी दिल्ली : फोर्ब्स आशियाने (Forbes Asia) दानशुर व्यक्तींच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी (Gautam Adani) , एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर (Shiv Nadar)आणि हॅपिएस्ट हिरोज टेक्नॉलॉजीजचे अशोक सूटा (Ashok Soota) यांच्या नावाचा समावेश केला आहे. फोर्ब्स आशिया हिरोज ऑफ फिलैथरोपीच्या 16 व्या यादीची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदाणी यांनी 60,000 कोटी रुपये (7.7 दशलक्ष डॉलर) धर्मादाय कार्यासाठी देण्यासाठीचे अभिवचन दिले आहे. अदाणी यांना फोर्ब्सने या यादीत पहिल्या स्थानी ठेवले आहे. अडाणी यांनी केलेले दान आरोग्य सेवा, शिक्षा आणि कौशल्य विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे.
हा निधी अडाणी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. हे फाऊंडेशन 1996 साली स्थापन करण्यात आले होते. 60 वर्षांच्या गौतम अदाणी यांचा समूह हा पोर्ट ऑपरेटर म्हणून अग्रेसर आहे. ऊर्जा, रिटेलसह अनेक उद्योगात या समूहाची मालकी आहे.
अरबपती शिवा नाडर या दानशुरांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांनी एक दशलक्ष डॉलर शिव नाडर फाऊंडेशनच्या माध्यमातून खर्च केले आहे. ही रक्कम विविध सामाजिक कार्यासाठी वापरण्यात आली आहे. त्यांच्या दानाचा आकडा अनेकांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करतो.
नाडर यांनी आतापर्यंत त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून 11,600 कोटी रुपयांचे दान केले आहे. शिव नाडर फाऊंडेशनची स्थापना 1994 साली करण्यात आली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक शाळा आणि विद्यापीठे सुरु आहेत.
तांत्रिक क्षेत्रातील प्रसिद्ध अशोक सूटा यांचे न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये मोठे संशोधन कार्य सुरु आहे. त्यांच्या वैद्यकीय संशोधन न्यासने 600 कोटींचे दान करण्याचे आश्वासन दिलेले आहे. एप्रिल 2021 मध्ये या ट्रस्टची घोषणा करण्यात आली होती.