जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिता जिथे तुम्हाला अधिक परतावा देखील मिळेल आणि गुंतवणूक केलेल्या रकमेला टॅक्समधून देखील सूट मिळेल तर तुमच्यासाठी आयडीबीआय (IDBI Bank) बँकेने एक खास योजना आणली आहे. या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. आयडीबीआय बँकेच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक फयादे मिळू शकतात. बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांची एफडी करावी लागेल. तुम्ही या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायदा कलम 80C अंतर्गत टॅक्समधून (tax) सूट मिळेल असा दावा बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी देखील एक अट आहे. ती म्हणजे तुम्हाला पाच वर्षांच्या आधी हे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत.
आयडीबीआय बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या याजोनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये पाच वर्षांसाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेंतर्गत कोणीही खाते ओपन करू शकते फक्त अट एकच आहे तो भारतीय नागरिक असावा. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ही रक्कम काढता येते. तसेच या गुंतवणुकीवर इनकम टॅक्सच्या नियमानुसार सूट देखील मिळते. या योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूकीवर 5.50 टक्क्यांनी व्याज देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिकांना अधिक 0.50 म्हणजे सहा टक्के व्याज देण्यात येते.
या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही ही गुंतवणूक तारण ठेवून, शैक्षणिक लोन, होम लोन, पर्सनल लोन देखील काढू शकता. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण परतावा मिळतो. या योजनेत खाते ओपन करण्यासाठी तुम्ही जवळच्या आयडीबीआय बँकेला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.
Paytm रिझर्व्ह बँकेच्या रडारवर; व्यवहारांमुळे विश्वास गमावला
20 वर्षांचे Home loan दहा वर्षांत कसे फेडाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला