फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. बाजार नियामक स्विगीने आयपीओला मंजूरी दिली आहे. या आयपीओचा गुंतवणूकदार प्रतिक्षा करत आहेत. त्यापूर्वी क्रिकेटसह सिनेमा जगतातील अनेक दिग्गजांनी स्विगीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह राहुल द्रविड आणि इतर दिग्गजांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार या आयपीओची प्रतिक्षा करत आहे. या आयपीओची किंमत आणि लॉट साईज किती असेल याविषयीची माहिती समोर आलेली नाही.
नोव्हेंबर महिन्यात येऊ शकतो आयपीओ
स्विगीचा प्रस्तावित आयपीओ नोव्हेंबर महिन्यात येऊ शकतो. या आयपीओच्या माध्यमातून बाजारातून 1 अब्ज डॉलरहून जमा करण्याचा प्रयत्न होणार आहे. भारतीय चलनात हा आयपीओ 8,350 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल. या प्रक्रियेनंतर स्विगी ही भारतातील सर्वात मोठी स्टार्टअप आयपीओ ठरेल. एका वृत्तानुसार, स्विगीच्या आयपीओच्या ड्राफ्ट्, मसुद्याला सेबीची मंजूरी मिळाली. या नोव्हेंबर महिन्यात हा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे.
या दिग्गजांनी खरेदी केले 2 लाख शेअर
स्विगीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडणार आहेत. त्यामुळे कंपनीच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये अनेक दिग्गजांनी गुंतवणूक केली आहे. ईटीच्या एका वृत्तानुसार, अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीचे जवळपास 2 लाख शेअरची खरेदी या दिग्गजांनी केली आहे. तर नुकतीच दोन सेलिब्रिटींनी या कंपनीत गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे.
या नामांकित व्यक्तींनी केली गुंतवणूक
स्विगीचा आयपीओ येण्यापूर्वीच अनेक कलाकार, खेळाडूंनी मोठी गुंतवणूक केली आहे. माजी क्रिकेटर राहुल द्रविड आणि जहीर खान, टेनिस स्टार रोहन बोपन्ना, चित्रपट निर्माता आणि निर्देशक करण जोहर, अभिनेता आशिष चौधरी यांचे नाव यामध्ये समावेश आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिने स्विगीत गुंतवणूक केली आहे. उद्योजक रितेश मलिक याने पण आयपीओ येण्यापूर्वी गुंतवणूक केली आहे. यापूर्वी स्विगीने सॉफ्टबँक व्हिझन फंड, एक्सेल आणि प्रोसेस यासारख्या जागतिक गुंतवणूकदारांकडून कंपनीने यापूर्वीच निधी मिळवला आहे.