क्रिकेटमध्येच नाही तर बिझनेसच्या पिचवर पण हिट Virat Kohli, या कंपनीवर लावला मोठा डाव; आता येतोय 1500 कोटींचा IPO

| Updated on: May 09, 2024 | 2:15 PM

Virat Kohli Go Digit IPO : क्रिकेटपटू विराट कोहली याने गो डिजीट जनरल इन्शुरन्समध्ये जवळपास 2 कोटी रुपयांची गुंतवणूक कलेी आहे. क्रिकेटच्या पिचसोबतच त्याने व्यावसायीक खेळी खेळली. एका वृत्तानुसार, गो डिजीटचा आयपीओ पुढील हप्त्यात येऊ शकतो.

क्रिकेटमध्येच नाही तर बिझनेसच्या पिचवर पण हिट Virat Kohli, या कंपनीवर लावला मोठा डाव; आता येतोय 1500 कोटींचा IPO
गुंतवणूक केली 'विराट'
Follow us on

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली हा क्रिकेट पिचवरच नाही तर बिझनेस फिल्ड पण गाजवत आहे. त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मा पण गुंतवणुकीत पुढे आहे. कोहलीने गुंतवणूक केलेली एक कंपनी तिचा IPO घेऊन येत आहे. गो डिजिट जनरल विमा कंपनी (Go Digit IPO) तिचा आयपीओ पुढील आठवड्यात घेऊन येण्याची शक्यता आहे.

1250 कोटी रुपयांचे नवीन शेअर बाजारात

बिझनेस टुडेमधील एका वृत्तानुसार, गो डिजिट जनरल इन्शुरन्स पुढील आठवड्यात आयपीओ घेऊन येत आहे. 15 मे रोजी हा आयपीओ बाजारात येऊ शकतो. या आयपीओची साईज 1500 कोटी असण्याची शक्यता आहे. कंपनी फ्रेश सेल अंतर्गत 1250 कोटी रुपये जमा करण्याची शक्यता आहे. तर ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून गो डिजिट 10.94 कोटी रुपयांच्या शेअर सादर करेल. त्याचे मूल्य 250 कोटी रुपये असेल.

हे सुद्धा वाचा

मार्च महिन्यात मिळाली मंजूरी

गो डिजीट जनरल इन्शुरन्स कंपनी वाहन, आरोग्य, प्रवास, मरीन, लायबिलिटी सारख्या विविध प्रकारचे विमा विक्री करते. आयपीओसाठी या कंपनीने बाजार नियंत्रक सेबीकडे अर्ज केला होता. मार्च 2024 मध्ये कंपनीला सेबीने आयपीओ आणण्याची मंजूरी दिली.

विरोटची 2 कोटी तर अनुष्काची इतकी गुंतवणूक

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी गो डिजीटमध्ये गुंतवणूक केली आहे. DRHP नुसार, ही सेलेब्रिटी जोडी स्टेकहोल्डर्सच्या यादीत आहे. विराट कोहली याने 2020 ने फेब्रुवारी महिन्यात कंपनीत 75 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने 2,66,667 स्टॉक्स खरेदी केले होते. त्यासाठी त्याने जवळपास 2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा हिने या कंपनीत 66,667 शेअरची खरेदी केली. तिने कंपनीत 50 लाख रुपयांची गुंतवणूक केली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.