नवी दिल्ली : सोने-चांदीने गेल्या तीन दिवसांतच मोठी झेप घेतली. सोन्याने तीन दिवसांत तर एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 19 एप्रिलपासून थंडावलेल्या भावात 3 मेपासून पुन्हा उलथापालथ दिसून आली. संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात (Jalgaon Sarafa Market) सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला. गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याने जोरदार उसळी घेतली. सोन्याच्या भावात एकाच दिवशी तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे भाव कडाडले असले तरी सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी ग्राहकांनी एकच झुंबड उडाली होती.
अमेरिकेच्या धोरणाचा परिणाम
अमेरिकेची केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्हने (American Federal Reserve) अंदाजाप्रमाणे व्याजदरात 25 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर लागलीच दिसून आला. या घोषणेनंतर स्पॉट गोल्डमध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. युएस गोल्ड फ्युचरमध्ये 1.3 टक्क्यांची वाढ होऊन ते 2,063.20 डॉलर प्रति औंसवर पोहचले. त्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून आला. सोन्याने जोरदार मुसंडी मारली.
असा वधारला भाव
3 मे रोजी सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 4 मे रोजी सोन्यात पुन्हा 500-540 रुपयांची दरवाढ झाली. 5 मे रोजी सोन्याच्या भावात 10 रुपयांची वाढ झाली. गेल्या तीन दिवसांतच सोन्याने हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे आतापर्यंत थंडावलेल्या बाजारपेठेत पुन्हा उलथापालथ दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या धोरणानुसार, सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होऊ शकतो.
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 5 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,160 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 62,340 रुपये आहे.. सोन्याने आज प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांची वाढ नोंदवली. तर चांदीने तीन दिवसांत हजार रुपयांचा टप्पा गाठला एक किलोमागे 1100 रुपयांची वाढ झाली. 2 मे रोजी एक किलो चांदी 76,100 रुपये होती. 5 मे रोजी हा भाव 77,100 रुपये किलो होता.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.
अशी तपासा शुद्धता