नवी दिल्ली : जून महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) काय घडामोड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मे महिना सोने-चांदी खरेदीदारांसाठी फायदेशीर ठरला. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्याने त्यांचा फायदा झाला. प्रति 10 ग्रॅम जवळपास दोन हजार रुपयांची घसरण झाली. लग्नसराईच्या लगबगीत ही घसरण अनेकांच्या पथ्यावर पडली. वधू आणि वराकडील मंडळींना स्वस्तात सोने खरेदी करता आले. 31 मे रोजी आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली होती. आज 2 जून रोजी सकाळच्या सत्रात भाव जाणून घेऊयात..
दोन दिवसांत भावात इतकी वाढ
goodreturns च्या आकडेवारीनुसार, 31 मे आणि 1 जून रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीने भाव वाढ नोंदवली होती. या दोन्ही दिवसांत 22 कॅरेटमध्ये 400 रुपयांची तर 24 कॅरेटमध्ये 450 रुपयांची वाढ नोंदवली होती. पण नंतर संध्याकाळी भावात पुन्हा घसरण झाली. भाव प्रति 10 ग्रॅम 150 रुपयांनी घसरले. आज 2 जून रोजी सकाळच्या सत्रात भावात कोणताही बदल झाला नाही. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60,930 रुपये झाले.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,157 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,916 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,104 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,118 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.