Gold Silver Price Today News | भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) गुरुवारी सोने-चांदीचे दर जाहीर झाले. ताज्या दरांवर नजर टाकली तर सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate Today) तेजी पाहायला मिळाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 51,815 रुपये तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51608 रुपये आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचे दर 57,598 रुपये झाले आहेत. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळच्या वेळी 995शुद्धतेचे दहा ग्रॅम सोन्याचा भाव 51,608 रुपया आहे, तर 916 शुद्धतेचे सोने आज 47463 रुपये विक्री होत आहे . याशिवाय 750 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 38,861 रुपयांवर गेला आहे. त्याचबरोबर 585 शुद्धता असलेले सोने आज 30312 रुपये झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदीचा आजचा भाव 57,598 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत ही आज वाढ झाली आहे. आता देशात सोन्यासाठी बुलियन एक्स्चेज सुरु झाल्याने देशभरात सोन्याच्या किंमती सारख्या असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दररोज सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल होत असतात. आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 999 शुद्धता असलेले सोने 249 रुपयांनी महागले आहे, 995 शुद्धता असलेले सोने 248 रुपयांनी, 916 शुद्धतेचे सोने 228 रुपयांनी, सोने 750 शुद्धतेचे सोने 186 रुपयांनी आणि सोन585 शुद्धतेसह सोने 146 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीची किंमती आज 289 रुपयांनी महाग झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,140 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,430 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,130 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,170 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,170 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,460 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.