Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे लागले पाणी! अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम

| Updated on: May 04, 2023 | 10:10 AM

Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे पाणी लागले. 19 एप्रिलपासून भावात मोठी उलाढाल झाली नव्हती. पण 3 मेपासून किंमती उसळल्या. अमेरिकेच्या या धोरणाचा मोठा परिणाम झाला..

Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे लागले पाणी! अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम
आजचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold Silver Price Update) पुन्हा सुसाट आहे. दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. 19 एप्रिलपासून भावात मोठी उलाढाल झाली नव्हती. पण 3 मेपासून किंमती उसळल्या. अमेरिकेच्या या धोरणाचा मोठा परिणाम झाला. आता तुम्ही म्हणाल 13,568 किलोमीटरवरील अमेरिकेच्या कोणत्या धोरणाचा परिणाम झाला असेल? तर अमेरिकेची केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्हने (American Fed Reserve) अंदाजाप्रमाणे व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर लागलीच दिसून आला. या घोषणेनंतर स्पॉट गोल्डमध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. युएस गोल्ड फ्युचरमध्ये 1.3 टक्क्यांची वाढ होऊन ते 2,063.20 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

सोन्याने टाकला गिअर
सोन्याने दरवाढीचा गिअर टाकला आहे. 3 मेपासून सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची वाढ झाली होती. आज सोन्यात पुन्हा 500-540 रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली. दोन दिवसांत सोन्याच्या भावात 1000 ते 1200 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या धोरणानुसार, सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होऊ शकतो.

आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 4 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,150 रुपये आहे. काल हा भाव 56,650 रुपये होता. 24 कॅरेटचा भाव 62,330 रुपये आहे. काल हा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याने आज प्रति 10 ग्रॅम 500-550 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदीने एक किलोमागे 300 रुपयांची आघाडी घेतली. आज एक किलो चांदीसाठी खरेदीदारांना 77,100 रुपये मोजावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

RBI ची सोने खरेदी
आरबीआयने कोरोनानंतर धोरण बदलविले. केंद्रीय बँकेने सोने खरेदी सुरु केली. जगावर आर्थिक संकट ओढावत असताना, रशिया-युक्रेन यु्द्धानंतर सोने आयात वाढवली. यावर्षीचा विचार केला तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली. आरबीआयने या तिमाहीत जवळपास 10 टन सोने खरेदी केले.

भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.