नवी दिल्ली : सोने-चांदीने मजल दरमजल न करता, थेट झेप घेतल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. ज्यांनी गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी सोन्यात गुंतवणूक केली. त्यांच्या घरी तर श्रीमंती पाणी भरत आहे. त्यांना सोने आणि चांदीने (Gold And Silver Price) लखपती, कोट्याधीश केले आहे. दिवाळीपूर्वी दोन्ही धातू स्वस्त होते. दिवाळीपासून दोन्ही धातूंनी दरवाढीची सलामी दिली आहे. हे वर्ष, 2023 गुंतवणूकदारांसाठी लकी ठरले आहे. गेल्या दुसऱ्या पर्यांयापेक्षा सोने-चांदीने बक्कळ कमाई करुन दिली आहे. सोने-चांदीने खरेदीदारांना झटपट श्रीमंत केले आहे. इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीपेक्षा सोने आणि चांदीतील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे.
असा झाला फायदा
100 दिवसांत भारतीय वायदे बाजाराने गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा दिला आहे. इतर गुंतवणूक पर्यांयापेक्षा सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरली. तर चांदीने गेल्या 100 दिवसांत 7 टक्के परतावा दिला. 2023 मध्ये सोने आणि चांदीने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले. यापूर्वीचे विक्रम मोडीत काढत त्यांनी नवीन विक्रम नावाव केला. वर्ष 2020 पासून दोन्ही धातूंनी अनेक शतकी खेळी खेळली. गेल्या 100 दिवसांत तर सोने आणि चांदीने अनेकांना झटपट श्रीमंत केले आहे.
डिजिलट गोल्डचा फायदा
प्रत्यक्ष सोने खरेदी नुकसानदायक असू शकते. सोन्याच्या शुद्धतेचा प्रश्न असतो. तसेच त्याच्या सुरक्षिततेबाबतही काळजी असते. सोन्याचे दागिने, तुकडे कुठे ठेवणार ही काळजी लागलेली असते. तर डिजिटल गोल्ड तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. ग्राहकाच्या वतीने इन्शुर्ड वॉल्टसमध्ये हे सोने साठवले जाते. त्यामुळे फिजिकल गोल्डसंबंधीत सर्व अडचणी दूर ठेवण्यात मदत मिळते. यासाठी तुमच्याकडे केवळ इंटरनेट वा मोबाईल बँकिंगची आवश्यकता असते. तुम्ही घरबसल्या, इतर कोणत्याही ठिकाणाहून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकता.
गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
चांदीच्या भावात जोरदार उसळी