नवी दिल्ली : सोने-चांदीने आता गिअर बदलविला. दोन आठवडे किंमतीत मोठा बदल झाला नव्हता. 19 एप्रिलपासून सोने-चांदीच्या दर थंडावलेले होते. पण 3 मेपासून दोन्ही धातूंनी जोरदार उसळी घेतली. देशातील अनेक शहरात सोने-चांदीने (Gold Silver Price) कर आणि इतर शुल्कासहित 63,000 हजारांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने दरवाढीचा विक्रम नावावर केला आहे. आता सोने 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. तर चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा व्होरा आहे.
1500 रुपयांची वाढ
3 मे पासून सोन्याच्या दरवाढीला मुहूर्त लागला. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या भावात जवळपास 1500 रुपयांची वाढ झाली. काल सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात 10 रुपयांची वाढ झाली. संध्याकाळी किंमती पुन्हा उसळल्या. आजही किंमतीत 10 रुपयांची वाढ झाली. 2 मे रोजी सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,850 रुपये होता. तर 24 कॅरेटचा भाव 60,910 रुपये होता. 6 मे रोजी हा भाव अनुक्रमे 57,360 रुपये आणि 62,560 रुपयांवर पोहचला.
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 6 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,360 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 62,560 रुपये आहे.. सोन्याने आज प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांची वाढ नोंदवली. 2 मे रोजी सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,850 रुपये होता. तर 24 कॅरेटचा भाव 60,910 रुपये होता.
चांदी उसळली
1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर आज 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते चांदी काही दिवसांतच 80,000 रुपये, त्यानंतर 90 हजार रुपयांवर पोहचेल.
मेकिंग चार्ज कसा निश्चित होतो
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.