Gold Silver Price Update : सोनं आलं बरं का रंगात! महागण्यापूर्वी आताच करा खरेदी, सोन्यात आज इतकी स्वस्ताई

| Updated on: Mar 12, 2023 | 10:22 AM

Gold Silver Price Update : सोन्याने पुन्हा त्याच्या जुन्या वळणावर आले आहे. सोन्याने गेल्या दोन दिवसांपासून ट्रॅक चेंज केला आहे. सोन्यात पुन्हा भाव वाढ झाली आहे. तरीही 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या भावापेक्षा सोने आजही स्वस्त आहे. कितीही आहे तफावत माहिती आहे का?

Gold Silver Price Update : सोनं आलं बरं का रंगात! महागण्यापूर्वी आताच करा खरेदी, सोन्यात आज इतकी स्वस्ताई
Follow us on

नवी दिल्ली : देशात सध्या लग्नाचा हंगाम जोरावर आहे. लग्न सोहळ्यांमुळे सोने-चांदीची खरेदी ही वाढली आहे. गेल्या महिन्याभरापासून सोने-चांदीत स्वस्ताईचा सिझन सुरु होता. 2 फेब्रुवारी रोजी सोने 58,880 रुपये तोळा तर चांदी 74,700 रुपये असा रेकॉर्ड ब्रेक भाव झाला होता. गेल्या महिन्यातील सर्वोच्च किंमतीपेक्षा त्यांना स्वस्तात सोने खरेदी करता येईल. त्यांना एक तोळ्यामागे मोठी बचत करता येणार आहे. या आठवड्यातील शेवटच्या दिवसात सोन्याच्या भावाने (Gold Price) उसळी घेतली. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) चढउतार सुरुच होता. गुडरिटर्न्सनुसार, रविवारी, 12 मार्च, 2023 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारच्या तुलनेत अनुक्रमे 760 रुपये आणि 840 रुपयांनी वधारला. तर शनिवारच्या तुलनेत त्यामध्ये 10 रुपयांची प्रति 10 ग्रॅम वाढ झाली.

शुक्रवारच्या भावाशी तुलना करता, 22 कॅरेट सोने 51,550 रुपयांहून 52,310 रुपये तोळा तर 24 कॅरेट सोने 56,210 रुपयांहून 57,050 रुपयांवर पोहचले. या किंमती सोन्याच्या ऑलटाईम हायच्या जवळपास आल्या असल्या तरी त्यात हजार रुपयांहून अधिकची तफावत आहे. त्यामुळे ग्राहकांना आताही स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. चांदीच्या किंमती अद्याप अद्ययावत करण्यात आल्या नाहीत. काल हा भाव किलोमागे 65,700 रुपये होता. 2 फेब्रुवारी रोजी चांदी 74,700 रुपये इतका उच्चांकी होती. शनिवारच्या तुलनेत किलोमागे चांदी 500 रुपयांनी महागली.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

हे सुद्धा वाचा

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

आठवडाभरात अशा बदलल्या किंमती

  1. शनिवारी शुद्ध सोन्यात 830 रुपयांची तफावत दिसून आली
  2. शुक्रवारी सोन्याचा भाव 383 रुपये प्रति तोळा महगले
  3. गुरुवारी 41 रुपये प्रति 10 ग्रॅम महागून 55286 रुपये झाले
  4. बुधवारी 844 रुपये प्रति 10 ग्रॅमने सोने झाले स्वस्त, भाव 55245 रुपये प्रति तोळा
  5. सोमवारी सोने 14 रुपये प्रति तोळा स्वस्त, 56089 रुपये होता भाव

चांदीने अशी बदलली चाल

  1. शनिवारच्या भावापेक्षा रविवाराच्या भावात 500 रुपयांची तफावत दिसली
  2. शुक्रवारी चांदीत केवळ 2 रुपयांची घसरण, भाव 61791 रुपये प्रति किलो
  3. गुरुवारी चांदी 90 रुपयांनी उतरली, भाव 61793 रुपये प्रति किलो
  4. बुधवारी गुंतवणूकदारांची चांदी, भावात 2383 रुपयांची घसरण, किंमत 61883 रुपये प्रति किलो
  5. मंगळवारी होळीमुळे बाजार होता बंद
  6. सोमवारी चांदीत 127 रुपयांची तेजी, भाव 64266 रुपये प्रति किलोवर बंद
  7. आयबीजेए (IBJA)शनिवारी, रविवारी भाव जाहीर करत नाही