सोने आणि शेअर बाजार एकदम सुसाट; कोण लवकर लखपती होणार? एक लाखांचा टप्पा गाठणार, तज्ज्ञांचा दावा तरी काय?

| Updated on: Sep 24, 2024 | 4:57 PM

Gold Or Share Market : सोने आणि शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे वाहत आहे. सोमवारी व्यापारी सत्रात शेअर बाजाराने नवीन रेकॉर्ड केला. सेन्सेक्स 85000 जवळपास पोहचला. तर सोन्याचे घोडे 75,000 ुरुपयांच्या जवळपास अडकले आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण एक लाखांचा टप्पा लवकर गाठणार ही चर्चा रंगली आहे.

सोने आणि शेअर बाजार एकदम सुसाट; कोण लवकर लखपती होणार? एक लाखांचा टप्पा गाठणार, तज्ज्ञांचा दावा तरी काय?
सोने की शेअर बाजार कुणाची होणार सरशी?
Follow us on

सोने-चांदी असो वा शेअर बाजार, यंदा दोघांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या दोघांचा यावर्षातील परतावा जवळपास सारखाच आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनी या काळात 17.50 टक्के रिटर्न दिला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 85 हजार अंकांचा टप्पा ओलांडून नवीन इतिहास रचला आहे. तर दुसरीकडे सोन्याने त्याचा सर्वकालीन उच्चांकी गाठण्याची कसरत सुरु केली आहे. त्यासाठी सोन्याला 500 रुपयांची आगेकूच करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या दोघांपैकी कोण एक लाखांचा टप्पा अगोदर गाठतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या वर्षात कशी आहे शेअर बाजाराची वाटचाल?

या वर्षात शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. मुंबई स्टॉक एक्सचेंज आता 85 हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे आले आहे. या वर्षात सेन्सेक्समध्ये 12,804.59 अंकांची तेजी दिसून आली. गेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सेंसेक्स 72,240.26 अंकांवर होता. तो आता 85,044.85 अंकांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. म्हणजे सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना या वर्षात 17.72 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

हे सुद्धा वाचा

तर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टीने पण रिटर्न देण्यात बाजी मारली आहे. निफ्टीने गुंतवणूकदारांना सेन्सेक्सच्या तुलनेत 2 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. निफ्टी सध्या 26 हजार अंकांच्या टप्प्यात आला आहे. या वर्षातील आकडेवारीवर लक्ष दिल्यास निफ्टीत 4,250.1 अंकांची तेजी दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरच्या व्यापारी सत्रात निफ्टी 21,731.40 अंकावर होता. तो वाढून 25,981.50 अंकांसह सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. निफ्टीने या वर्षात गुंतवणूकदारांना आतापर्यंत 19.55 टक्के रिटर्न दिला आहे.

सोने-चांदीची जोरदार बॅटिंग

शेअर बाजारासोबतच या वर्षात सोने आणि चांदीने जोरदार बॅटिंग केली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी शेअर बाजारात इतकाच रिटर्न दिला आहे. देशातील वायदे बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 11,434 रुपये प्रति 10 चा फायदा दिसून आला. गेल्या वर्षाच्या अखेरच्या व्यापारी सत्रात सोने एमसीएक्सवर र 63,203 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. आता हा भाव वाढून 74,637 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला आहे. या वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 18 टक्के रिटर्न दिला आहे.

कोण लवकर बाजी मारणार?

एचडीएफसी सिक्युरिटीज करन्सी कमोडिटीचे प्रमुख अनुज गुप्ता यांनी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, बजेटनंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती 6 टक्क्यांपेक्षा अधिक घसरल्या. जर हे आयत शुल्क कपात झाली नसती तर आज सोने सेन्सेक्सच्या बरोबरीने म्हणजे 80 हजारांच्या वर असते. सध्या अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याज दर कमी केल्याचा फायदा बाजाराला होताना दिसत आहे. पण जागतिक पातळीवर मोठे संकट आले तेव्हा शेअर बाजारावर त्याचा परिणाम दिसेल. पण सोन्याची मोठी घौडदौड दिसत असल्याचे ते म्हणाले.