Gold Silver Price News : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर (Dollar in International Market) मजबूत स्थितीत आहे. परिणामी सोन्या आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) सातत्याने घसरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास 1150 रुपयांनी कमी झाले होते. या आठवड्यातही सलग दुस-या दिवशी वायदे बाजारावर दबाव दिसून येत आहे. भारताय बाजारात MCX वर सोन्याची डिलिव्हरी सककाळी 11:40 वाजता 66 रुपयांची घसरण नोंद झाली आणि सोने 50,578 रुपयांच्या स्तरावर व्यापार करु लागले. चांदीत 531 रुपयांची घसरण झाली आणि चांदीचे भाव 56,394 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डवर (Spot Gold) ही दबाव दिसून आला. सध्या सोने 5 डॉलरच्या घसरणीसह 1727 डॉलरच्या स्तरावर व्यापार(Trade) करत आहे. सप्टेंबर 2021 नंतर स्पॉट गोल्ड मध्ये हा सर्वात कमी दर आहे. डॉलर इंडेक्स सध्या गेल्या 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे.
भारतीय सराफा बाजारने मंगळवारी सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले. आज दोन्ही धातूच्या किंमतीत घसरण झाली. 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,770 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 999 शुद्ध चांदीचे दर किलोमागे 56,046 रुपये भाव आहे. सोन्याचे दर दिवसभरात दोनदा जाहीर करण्यात येतात. एकदा सकाळी आणि नंतर संध्याकाळी हे दर जाहीर होतात. 995 शुद्धतेच्या सोन्याचे दर 50,567 रुपये, 916 शुद्ध सोन्याचे भाव 46,322 रुपयांना विक्री होत होते. याव्यतिरिक्त 750 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 37,928 रुपये, तर 585 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 29,583 रुपये आहे. 999 शुद्ध चांदी किलोमागे 56,046 रुपये दराने विक्री होत होती.
सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.
सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.