मुंबई: काही महिन्यांपूर्वी जवळपास 56 हजारांपर्यंत गेलेल्या सोन्याचा किंमतीत आता मोठी घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 5 फेब्रुवारी 2021 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत MCX एक्सचेंड वर 519 रुपयांच्या घसरणीसह 48 हजार 702 रुपये प्रतितोळा राहिली. तर एप्रिल 2021 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी MCX वर 514 रुपयांच्या घसरणीसह 48 हजार 715 रुपये प्रति तोळा राहिली आहे.(Gold and silver prices fall sharply in 5 months)
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोमवारी 11 जानेवारीला MCX वर 5 फेब्रुवारी 2121 च्या वायद्याच्या सोन्याची किंमत 48 हजार 786 रुपये प्रति तोळा होती. तर यापूर्वी 1 तोळा सोन्याची किमंत 48 हजार 967 रुपयावर बाजार बंद झाला होता. म्हणजे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 265 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी 5 मार्च 2021 च्या वायद्याच्या चांदीची किंमत MCX वर 1 हजार 919 रुपयांच्या घसरणीसह प्रति किलो 64 हजार 764 रुपये राहिली. 11 जानेवारीला MCX वर चांदीचा भाव प्रतिकिलो 63 हजार 603 रुपये राहिला होता. त्यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 64 हजार 231 रुपये प्रति किलोवर राहिली होती. त्यानुसार चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात 533 रुपयांनी वाढ झाली आहे.
कोरोना काळात सोनं 57 हजार 100 रुपये प्रति तो हळा झालं होतं. 5 फेब्रुवारी 2021 च्या वायदा सोन्याच्या किंमतीत मागील उच्चांक 7 ऑगस्ट 2020 ला पाहायला मिळाला होता. त्या सत्रात फेब्रुवारी 2021 च्या वायदा सोन्याची किंमत तब्बल 57 हजार 100 रुपये प्रति तोळा राहिली होती. सध्याच्या सोन्याच्या किमतीची तुलना केली तर ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ही सध्याच्या किमतीपेक्षा 8 हजार 398 रुपये जास्त होती.
मुंबईत आज सोनं प्रति तोळा 48 हजार 910 रुपयांवर आलं आहे. मुंबईतील कालची सोन्याची किंमत ही 49 हजार 450 रुपये होती. म्हणजे कालपेक्षा आज सोन्याचे भाव 540 रुपयांनी स्वस्त झालाय. तर पुण्यातील सोन्याचा भाव पाहायचा झाला तर मुंबई प्रमाणेच पुण्यातही आज सोनं 540 रुपयांनी स्वस्त झालं आहे. पुण्यातील सोन्याचा आजचा भाव प्रति तोळा 48 हजार 910 रुपये आहे.
11 जानेवारी – 5 हजार 1 रुपये
12 जानेवारी – 5 हजार 1 रुपये
13 जानेवारी – 5 हजार 20 रुपये
14 जानेवारी – 5 हजार 16 रुपये
15 जानेवारी – 4 हजार 993 रुपये
16 जानेवारी – 4 हजार 954 रुपये
17 जानेवारी – 4 हजार 954 रुपये
संबंधित बातम्या :
लसीच्या बातमीमुळे सोने-चांदी 1700 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या तोळ्याचा भाव
Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?
Gold and silver prices fall sharply in 5 months